Virat Kohli : पहिल्या कसोटीत रूट, स्मिथसह द्रविडही असेल किंग कोहलीच्या रडारवर

India Vs Bangladesh 1st Test Virat Kohli Record
India Vs Bangladesh 1st Test Virat Kohli Recordesakal
Updated on

India Vs Bangladesh 1st Test Virat Kohli Record : भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिका नुकतीच संपली. यजमान बांगलादेशने भारताचा 2 - 1 असा पराभव करत मालिका विजय साजरा केला. आता हा झुंजार बांगलादेश कसोटीमध्ये देखील भारताला आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना हा 14 डिसेंबरपासून झाहूर अहमद चौधरी स्टेडियमवर सुरू होणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाहीये. त्यामुळे या कसोटीत भारताची रन मशीन विराट कोहलीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या कसोटी सामन्यात विराट कोहलीला मोठमोठे कारनामे करण्याची नामी संधी आहे.

India Vs Bangladesh 1st Test Virat Kohli Record
IND vs BAN: सरावावेळी असं काही घडलं! बांगलादेशचा कर्णधार थेट ॲम्ब्युलन्समधून गेला रूग्णालयात

विराट कोहलीसाठी बांगलादेशविरूद्धची कसोटी मालिका खास असणार आहे. 2019 मध्ये विराट कोहलीने आपले 70 वे शतक बांगलादेशविरूद्धच ठोकले होते. हे शतक कसोटी सामन्यात ठोकले गेले होते. त्यानंतर विराट शतकांच्या दुष्काळातून गेला. अखेर अफगाणिस्तानविरूद्धच्या टी 20 सामन्यात त्याने आपला हा दुष्काळ संपवला. आता पुन्हा एकदा विराटच्या समोर बांगलादेशचे गोलंदाज आहेत. तसेच त्याच्या बॅटमधून 28 वे शतक येण्याची भारतीय चाहते प्रतिक्षा करत आहेत. जर विराटने पहिल्या कसोटीत शतक झळकावले तर तो स्टीव्ह स्मिथ आणि जो रूट यांच्याशी कसोटी शतकांच्या बाबतीत बरोबरी करेल. तसेच सर्वाधिक कसोटी शतके ठोकण्याच्या रेसमध्येही तो पुन्हा एकदा सामील होईल.

India Vs Bangladesh 1st Test Virat Kohli Record
Anand Mahindra : केनच्या हुकलेल्या पेनाल्टीवर आनंद महिंद्रांचा प्रश्न, वेळेत उत्तर द्या अन् जिंका गाडी

विराट कोहली शतक ठोकून स्मिथ आणि रूटलाच या कसोटीत मागे टाकू शकतो असे नाही तर त्याच्या रडारवर सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड देखील असणार आहेत. जर या मालिकेत विराट कोहलीने अजून 169 धावा केल्या तर तो कसोटीत बांगलादेशविरूद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांच्या यादीत द्रविडला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहचू शकतो. या यादीत पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. त्याने 7 सामन्यात 9 डावात 136 च्या सरासरीने 820 धावा केल्या आहेत. यात एक द्विशतक आणि 5 शतकांचा समावेश आहे.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.