India vs Bangladesh Live Score 2nd Test Day-1 : भारताने बांगलादेशचा पहिला डाव पहिल्याच दिवशी 227 धावांवर संपवला. भारताकडून उमेश यादवने 4 तर अश्विनने 4 विकेट्स घेत बांगलादेशच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. 12 वर्षानंतर कसोटीत पुनरागमन करणाऱ्या जयदेव उनाडकटनेही 2 विकेट्स घेतल्या. बांगलादेशकडून मोमिनूल हकने झुंजार खेळी करत 84 धावा केल्या. भारताने दिवसअखेर आपल्या पहिल्या डावात बिनबाद 19 धावा केल्या.
भारताने दिवसाची 14 षटके शिल्लक असताना आपला पहिला डाव खेळण्यास सुरूवात केली. सालामीवीर केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी 8 षटकात 19 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर पंचांनी अंधूक प्रकाशामुळे खेळ 6 षटके शिल्लक असतानाच दिवसाचा खेळ थांबवला.
अश्विनने बांगलादेशचा झुंजार फलंदाजी करणाऱ्या मोमुनिल हकला 84 धावांवर बाद करत मोठा धक्का दिला. त्यानंतर खालेद अहमदला शुन्यावर बाद करत बांगलादेशचा डाव 227 धावांवर संपवला. अश्विनने 71 धावात 4 तर उमेश यादवने 25 धावात 4 बळी टिपले. त्यांना जयदेव उनाडकटने 2 विकेट घेत चांगली साथ दिली.
उमेश यादवने चहापानानंतर बांगलादेशला धक्के देणे सुरूच ठेवले. त्याने टस्किन अहमदला 1 धावांवर बाद करत आपला चौथा बळी टिपला.
चहापानानंतर भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने बांगलादेशला दोन धक्के दिले. त्याने मेहदी हसन मिराजला 15 तर 6 धावांवर बाद केले. दरम्यान, मोमिनुल हकने झुंजार फलंदाजी करत संघाला 200 च्या पार पोहचवले.
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने बांगलादेशची चहापानापर्यंत 5 बाद 184 धावा अशी अवस्था केली. बांगलादेशचा मोमिनुल हक् 65 धावा करून एकाकी झुंज देत आहे.
172 धावांच्या स्कोअरवर बांगलादेशची पाचवी विकेट पडली. रविचंद्रन अश्विनने लिटन दासला कर्णधार लोकेश राहुलकडे झेलबाद केले. लिटन दासने 26 चेंडूत 25 धावा केल्या. त्याच्या खेळीत दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
जयदेव उनाडकटने भारताला चौथे यश मिळवून दिले आहे. त्याने मुशफिकर रहीमला बाद करून बांगलादेशला मोठा धक्का दिला आहे. रहिमने 46 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 26 धावा केल्या. उनाडकटच्या चेंडूवर ऋषभ पंतने त्याचा झेल टिपला.
उमेश यादवने बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनला बाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. चेतेश्वर पुजाराने त्याचा झेल घेतला. शाकिबने 39 चेंडूत 16 धावा केल्या. अब मोमिनुल हकसोबत मुशफिकुर रहीम क्रीजवर आहे. बांगलादेशची धावसंख्या 29 षटकांनंतर 3 बाद 83 अशी आहे.
पहिल्या दिवशी लंचपर्यंत बांगलादेशने 28 षटकांत दोन गडी गमावून 82 धावा केल्या आहेत. कर्णधार शाकिब अल हसन 16 आणि मोमिनुल हक 23 धावा करून खेळत आहेत. पहिल्या सत्रात भारताकडून जयदेव उनाडकट आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
अश्विनने बांगलादेशला दिला दुसरा धक्का दिला आहे. बांगलादेशने आपले दोन्ही सलामीवीर चार चेंडूंत गमावले आहेत. झाकीर बाद झाल्यानंतर शांतोही तिसऱ्या चेंडूवरच पॅव्हेलियनमध्ये परतला. रविचंद्रन अश्विनने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. शांतोने 57 चेंडूत 24 धावा केल्या.
39 धावांवर बांगलादेशची पहिली विकेट पडली. गेल्या सामन्यात शतक झळकावणारा झाकीर हसन 34 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. 12 वर्षांनंतर भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या जयदेव उनाडकटने भारताला पहिले यश मिळवून दिले आहे. तसेच त्याची कसोटी क्रिकेटमधील ही पहिली विकेट आहे. बांगलादेशची धावसंख्या 15 षटकांत 1 बाद 39 धावांवर आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेश संघाने सावध सुरुवात केली आहे. बांगलादेशच्या धावसंख्येने एकही विकेट न गमावता 20 धावा केल्या आहेत. झाकीर हसनला पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले. 10 षटक संपल्यानंतर बांगलादेशची धावसंख्या 22 आहे.
कुलदीप यादवच्या जागी जयदेव उनाडकटचा संघात समावेश करण्यात आला आहे. कुलदीपने मागच्या सामन्यात चेंडू आणि बॅटने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले होते. भारतीय कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेकीच्या वेळी सांगितले की, कुलदीपला संघाबाहेर पाहून वाईट वाटले, पण उनाडकटसाठी ही सर्वोत्तम संधी आहे. जयदेव उनाडकट भारतासाठी पहिला कसोटी सामना खेळत आहे.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश संघ दोन बदलांसह या सामन्यात उतरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.