IND vs BAN Playing-11: कर्णधार राहुल मोठी चूक सुधारणार! या फ्लॉप खेळाडूला करणार बाहेर...

India vs Bangladesh 2nd Test Match Playing-11
India vs Bangladesh 2nd Test Match Playing-11sakal
Updated on

India vs Bangladesh 2nd Test Match Playing-11 : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना उद्यापासुन ढाका येथे खेळल्या जाणार आहे. या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने आधीच 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत टीम इंडियाने दुसरा कसोटी सामनाही जिंकला तर बांगलादेशचा 2-0 असा धुव्वा उडवून मालिका जिंकेल.

India vs Bangladesh 2nd Test Match Playing-11
IPL 2023 Auction: 2 कोटी बेस प्राईसमध्ये नाही एकही भारतीय; खेळाडूंची संपूर्ण यादी एका क्लिकवर

भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामनाही खेळू शकणार नाही. अशा स्थितीत दुसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुल टीम इंडियाचा कर्णधार असणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार केएल राहुल आपली सर्वात मोठी चूक सुधारू शकतो. एका फ्लॉप खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. दुसऱ्या कसोटी सामन्यात हा खेळाडू टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडणार हे जवळपास निश्चित आहे.

India vs Bangladesh 2nd Test Match Playing-11
Ranji Trophy Ajinkya Rahane : अजिंक्यने IPL लिलावासाठी थोपटले दंड; ठोकले द्विशतक

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार केएल राहुल वेगवान गोलंदाज उमेश यादवला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. चितगाव येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज उमेश यादवची कामगिरी खराब होती. बांगलादेशविरुद्ध चितगाव येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात उमेश यादवला केवळ 2 विकेट घेता आल्या होत्या. टीम इंडियामध्ये स्पर्धा सातत्याने वाढत आहे, अशा परिस्थितीत उमेश यादवची ही कामगिरी कसोटी संघातील स्थान वाचवण्यासाठी पुरेशी नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()