Ind vs Ban Weather Updates : भारत-बांगलादेश सामन्याला हवामानाचा फटका, आजही पावसामुळे सामना जाणार वाहून?

India vs Bangladesh Colombo Weather Updates
India vs Bangladesh Colombo Weather Updates
Updated on

IND Vs BAN Rain Asia Cup 2023: आशिया कप 2023 च्या सुपर फोरचा शेवटचा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाणार आहे. टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे. तर बांगलादेशचा संघ अंतिम फेरीतून बाहेर पडला आहे.

अंतिम फेरीत भारताचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. याआधी बांगलादेशशी सामना आहे. हा सामना कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे. हवामान खात्यानुसार, भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्यान पाऊस पडू शकतो.

India vs Bangladesh Colombo Weather Updates
Asia Cup : 'नसीम शाह वर्ल्ड कपमधून बाहेर...', कर्णधार बाबर आझमच्या वक्तव्याने अख्ख्या पाकिस्तानला बसला शॉक

कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर आज भारत विरुद्ध बांगलादेश सामना दुपारी ३ वाजता रंगणार आहे. कोलंबोमध्ये आज पावसाची 88 टक्के शक्यता आहे. Accuweather च्या अहवालानुसार, कोलंबोमध्ये संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सामना काही काळ थांबवला जाऊ शकतो. मात्र, त्यानंतर पावसाची शक्यता फारच कमी आहे.

India vs Bangladesh Colombo Weather Updates
PAK vs SL : रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर पाकिस्तान Asia Cupमधून बाहेर! फायनलमध्ये टीम इंडियाशी भिडणार श्रीलंका

या सामन्यासाठी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकते हे लक्षात घेण्यासारखे आहे. भारतीय संघ हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देऊ शकतो. तर शार्दुल ठाकूर किंवा अक्षर पटेल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. टीम इंडिया मोहम्मद शमी आणि तिलक वर्मा यांनाही आजमावू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.