IND vs BAN Video : भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात बांगलादेशने दमदार सुरूवात केली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत बांगलादेशला एका पाठोपाठ एक धक्के देण्यास सुरूवात केली. सामन्यावर पुन्हा पकड मिळवण्यात गोलंदाजीपाठोपाठ क्षेत्ररक्षकांनी देखील मोलाची भुमिका बजावली.
मात्र शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत असताना असं काही घडलं जे पाहून चाहत्यांना डोक्याला हातच लावला. क्षेत्ररक्षणात आतापर्यंतच्या वर्ल्डकपमध्ये भारत अव्वल आहे. विराट कोहलीचे कॅचिंग पर्सेंटेज हे 90 टक्क्याच्या पार पोहचले आहे. मात्र आजच्या सामन्यात एका आव्हर थ्रोने सर्व कष्टावर पाणी फेरले.
बांगलादेशचे मधल्या फळीतील फलंदाज मुशफिकूर रहीम आणि तोहिद ह्रदोय हे पडझडीनंतर डाव सावरण्याचा प्रयत्न करत होते. भारतीय गोलंदाज या दोघांना टिच्चून मारा करत होते. त्यातच शार्दुल ठाकूर टाकत असलेल्या 31 व्या षटकात रहीमने सॉफ्ट हँडने डिफेन्स करत एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला.
यादरम्यान, पॉईंटला उभ्या असलेल्या रविंद्र जडेजाने डायरेक्ट हीट थ्रो केला. मात्र तोपर्यंत तोहिद क्रीजमध्ये पोहचला होता. चेंडू स्टम्पला लागून किपरच्या दिशने गेला. केएल राहुलने देखील चपळाई दाखवत चेंडू अडवला आणि बॉलर एन्डला टाकला. मात्र तोपर्यंत बांगलादेशच्या फलंदाजांनी दुसरी धाव देखील पूर्ण केली होती. राहुलचा हा थ्रो देखील अचूक स्टम्पवर लागला. तेथेही बांगलादेशच्या फलंदाजांना एक धाव मिळाली.
डायरेक्ट हीटच्या बाबतीत दोन्ही खेळाडूंची पक्का सराव केला असल्याचं सिद्ध झालं. मात्र त्याचा भुरदंड हा बिचाऱ्या शार्दुल ठाकूरला बसला. त्याच्या एका चेंडूवर तीन धावा झाल्या. हा सगळा प्रकार पाहून विराट कोहलीने आपली वृदृष्टी फिरवली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रोहित शर्माला देखील काय बोलावं तेच कळत नव्हतं. कारण हा प्रकार भारतीय संघातील अव्वल क्षेत्ररक्षक रविंद्र जडेजा आणि वरिष्ठ खेळाडू केएल राहुल यांच्यामुळे झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.