Video: "...तोपर्यंत डेट करणार नाही"; गहुंजे स्टेडिअमबाहेर झळकली पुणेरी पाटी, चाहत्यांचा जल्लोष

क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश सामना आज पुण्यातील गहुंजे स्टेडियम इथं होणार आहे.
Video: "...तोपर्यंत डेट करणार नाही"; गहुंजे स्टेडिअमबाहेर झळकली पुणेरी पाटी, चाहत्यांचा जल्लोष
Updated on

पुणे : क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश सामना आज पुण्यातील एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गहुंजे इथं होणार आहे. यासाठी पुणेकर चाहत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. काही तरुणांनी आत्ताच स्टेडिअमबाहेर हजेरी लावली आहे.

भारतीय संघाला प्रोत्साहित करण्यासाठी चाहते खास संदेश देणारे फलक घेऊन हजर झाले आहेत. यातील एका फलकानं अर्थात पुणेरी पाटीनं लक्ष वेधून घेतलं आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. (India Vs Bangladesh ICC Mens Cricket World Cup 2023 match Pune Cricket fans gather outside Gahunje Stadium)

Video: "...तोपर्यंत डेट करणार नाही"; गहुंजे स्टेडिअमबाहेर झळकली पुणेरी पाटी, चाहत्यांचा जल्लोष
Shivsena: नबाम रेबिया प्रकरणावर आता पुढच्या वर्षी सुनावणी; मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात होणार सुनावणी

स्टेडिअमबाहेर पुणेरी पाटी

गहुंजे स्टेडिअमबाहेर या व्हिडिओनं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये दोन तरुणांच्या हातात दोन वेगवेगळे फलक आहेत. यातील एका फलकावर I will not date untill Rohit Sharma lifts up world cup अर्थात 'जोपर्यंत रोहित शर्मा विश्वचषक उंचावत नाही तोपर्यंत मी डेट करणार नाही' असं या पठ्ठ्यानं अस्सल पुणेरी स्टाईलमध्ये जाहीर केलंय. (Latest Marathi News)

Video: "...तोपर्यंत डेट करणार नाही"; गहुंजे स्टेडिअमबाहेर झळकली पुणेरी पाटी, चाहत्यांचा जल्लोष
'कोल्हापूरसारखाच साताऱ्यात देखील साजरा होणार उदयनराजेंचा शाही दसरा; मिरवणुकीत असणार उंट-घोडे, शासनाचाही सहभाग'

तर दुसऱ्या एकानं हातात जो फलक घेतला आहे त्यावर लिहिलंय की, Cricket is my Religion, Rohit Sharma is my God अर्थात 'क्रिकेट हा माझा धर्म तर रोहित शर्मा देव आहे' अशा शब्दांत या पठ्ठ्यानं आपलं क्रिकेटवरील आणि रोहित शर्मावरील प्रेम व्यक्त केलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Video: "...तोपर्यंत डेट करणार नाही"; गहुंजे स्टेडिअमबाहेर झळकली पुणेरी पाटी, चाहत्यांचा जल्लोष
Mahesh Bhatt : 'वयानुसार येणारं म्हातारपण स्विकारलं पाहिजे, नाहीतर...' महेश भट्ट आता काय बोलून गेले?

घोषणाबाजीनं दणाणलं

दरम्यान, या तरुणांच्या गटानं गहुंजे स्टेडिअमबाहेर एकत्र येत घोषणाबाजी देखील केली. भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा त्यांनी दिल्या. तसेच टीम इंडियाची जर्सी परिधान करुन त्यांनी आपण भारतीय संघाचे खंदे पाठीराखे आहोत असं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.