IND vs BAN : टीम इंडियात नेतृत्व बदलाचे वारे! बांगलादेश दौऱ्यात होणार मोठा बदल

टीम इंडियासाठी बांगलादेश दौरा एका खराब स्वप्नापेक्षाही भयंकर
India vs Bangladesh 3rd Odi Match
India vs Bangladesh 3rd Odi Matchsakal
Updated on

India vs Bangladesh 3rd Odi Match : टीम इंडियासाठी बांगलादेश दौरा एका खराब स्वप्नापेक्षाही भयंकर राहिला आहे. टीम इंडिया या दौऱ्यात आजून पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. दुसरीकडे संघाचे अनेक खेळाडू जखमी झाले आहेत. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात आता टीम इंडिया मोठ्या बदलांसह उतरणार आहे. या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी सामने खेळायचे आहेत.

India vs Bangladesh 3rd Odi Match
Virender Sehwag : यांना हलवून जागं करायला हवं... विरेंद्र सेहवागच्या टीम इंडियाला कानपिचक्या

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक रोहुल द्रविड यांनीही सामन्यानंतर स्पष्ट केले आहे की, तो तिसऱ्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. टीम इंडिया तिसऱ्या वनडेत नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. दुसऱ्या वनडेत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलने टीम इंडियाची कमान सांभाळली, अशा परिस्थितीत आगामी सामन्यात फक्त केएल राहुलच कर्णधारपद भूषवताना दिसतो. तो संघाचा उपकर्णधारही आहे.

India vs Bangladesh 3rd Odi Match
Kuldeep Sen : लागलं ग्रहण! केवळ एकच सामना खेळून कुलदीप सेन संघातून बाहेर

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला होता, 'रोहित मुंबईला जाणार आहे आणि त्याच्या बोटाची दुखापत कशी आहे हे तज्ञांना दाखवेल. तो कसोटी मालिकेत खेळू शकेल की नाही हे आम्ही सांगण्याच्या स्थितीत नाही. जर रोहित शर्मा कसोटी मालिकेपूर्वी तंदुरुस्त नसेल तर केएल राहुलला कसोटीतही कर्णधारपदाची संधी मिळू शकते.

India vs Bangladesh 3rd Odi Match
IND vs BAN : बांगलादेशविरुद्ध पाठोपाठ ठोकली दोन शतके! आता रोहितची जागा घेण्यासाठी सज्ज

केएल राहुलने आतापर्यंत 1 टेस्ट मॅच, 6 वनडे आणि 1 टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले, एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाने 3 सामने जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत, तर केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या एकमेव टी-20मध्ये टीमने विजय मिळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.