IND vs BAN T20WC22 : भारताचा थरारक विजय, सेमी फायनलचे तिकिट निश्चित

India vs Bangladesh T20 World Cup 2022
India vs Bangladesh T20 World Cup 2022esakal
Updated on

India vs Bangladesh T20 World Cup 2022 : पावसामुळे अतिरंजक झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 5 धावांनी पराभव करत आपले सेमी फायनलचे तिकिट फिक्स केले. पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशसमोर 16 षटकात विजयासाठी 151 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. मात्र बांगलादेशला 16 षटकात 145 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून हार्दिक पांड्याने 2 तर अर्शदीप सिंगने 2 विकेट घेतल्या.

भारताने ठेवलेल्या 185 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने धडाकेबाज सुरूवात केली. सलामीवीर लिटन दासने भारताच्या गोलंदाजींच्या चिंधड्या उडवून देत संघाला 7 षटकात 66 धावांपर्यंत पोहचवले. यात लिटन दासच्या एकट्याचे नाबाद 59 धावांचे योगदान आहे. दुसरा सलामीवीर नजिमुल हुसैन शांतोने 16 चेंडूत नाबाद 7 धावा केल्या आहेत. दरम्यान, सात षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. त्यामुळे सामना थांबला.

पावसाने उसंत घेतल्यामुळे सामना भारतीय वेळेनुसार 4.50 मिनिटांनी सामना पुन्हा सुरू झाला. बांगलादेशला डीएलएस नियमानुसार आता 6 षटकात 151 धावांच नवं टार्गेट मिळालं. पावसामुळे खेळ थांबला त्यावेळी बांगलादेश 7 षटकात बिनबाद 66 धावांवर होता. म्हणजे बांगलादेशला आता 54 चेंडूत 85 धावा कराव्या लागणार होत्या.

सामना इथं फिरला

दरम्यान, खेळ सुरू झाल्या झाल्या केएल राहुलने धोकादायक लिटन दासला 60 धावांवर धावबाद केले. लिटन दास बाद झाल्यानंतर मोहम्मद शमीने दुसरा सलामीवीर नजमुल हुसैने शांतोला 21 धावांवर बाद करत बांगलादेशला दुसरा धक्का दिला. बांगलादेशचे दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर कर्णधार शाकिबने धुरा खांद्यावर घेत सामना 30 चेंडूत 54 धावा असा आणला.

मात्र अर्शदीपने अफिफ हुसैनला 3 धावांवर बाद करत बांगलादेशला तिसरा धक्का दिला. याच षटकात अर्शदीपने कर्णधार शाकिबला 13 धावांवर बाद करत बांगलादेशला मोठा धक्का दिला. पाठोपाठ हार्दिक पांड्याने चौधरीला बाद करत बांगलादेशचा पाचवा फलंदाज माघारी धाडला. याचबरोबर मोसादकला देखील याच षकात बाद करत सामना 18 चेंडूत 43 धावा असा आला.

- अर्शदीपने 14 व्या षटकात 12 धावा दिल्या त्यामुळे सामना 12 चेंडूत 31 धावा असा आला.

- 15 वे षटक टाकणाऱ्या हार्दिक पांड्याने टाकले. या षटकात बांगलादेशने एक षटकार आणि एक चौकार मारत 10 धावा केल्या.

शेवटच्या षटकाचा थरार

शेवटच्या 16 व्या षटकात बांगलादेशला विजयासाठी 20 धावांची गरज होती. अर्शदीप सिंगने हे षटक टाकण्याची जबाबदारी उचलली.

1 पहिल्या चेंडूवर 1 धाव

2 दुसऱ्या चेंडूवर सोहानने षटकार मारला, 4 चेंडूत 13 धावांची गरज

3 तिसऱ्या चेंडू निर्धाव तीन चेंडूत 13 धावा

4 चौथ्या चेंडूवर दोन धावा, सामना 2 चेंडू 11 धावा

5 अर्शदीप सिंगने चौकार दिला सामना 1 चेंडू 7 धावा असा आला.

6 शेवटच्या चेंडूवर अर्शदीपने एक धाव देत सामना जिंकून दिला.

तत्पूर्वी, बांगलादेशविरूद्धच्या महत्वपूर्ण सामन्यात रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक ही भारताची मोठमोठी नावं आपल्या लैकिकास साजेसा खेळ करू शकली नाही. अखेर भारताची रन मशिन पुन्हा एकदा भारतासाठी उभी राहिली. विराट कोहलीने 44 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी करत भारताला 184 धावांपर्यंत पोहचवले. सलामीवीर केएल राहुलने देखील यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमधील आपले पहिले अर्धशतक झळकावले. तसेच सलग दोन सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने देखील 16 चेंडूत 30 धावांची आक्रमक खेळी केली. अश्विनने 6 चेंडूत 13 धावा करून शेवटच्या षटकात मोठा हातभार लावला. मात्र या चौघांव्यतिरिक्त इतर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. बांगलादेशकडून हसन महमूदने दमदार गोलंदाजी करत 3 विकेट्स घेतल्या.

शेटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताचा विजय

शेवटच्या षटकाचा थरार

शेवटच्या 16 व्या षटकात बांगलादेशला विजयासाठी 20 धावांची गरज होती. अर्शदीप सिंगने हे षटक टाकण्याची जबाबदारी उचलली.

1 पहिल्या चेंडूवर 1 धाव

2 दुसऱ्या चेंडूवर सोहानने षटकार मारला, 4 चेंडूत 13 धावांची गरज

3 तिसऱ्या चेंडू निर्धाव तीन चेंडूत 13 धावा

4 चौथ्या चेंडूवर दोन धावा, सामना 2 चेंडू 11 धावा

5 अर्शदीप सिंगने चौकार दिला सामना 1 चेंडू 7 धावा असा आला.

6 शेवटच्या चेंडूवर अर्शदीपने एक धाव देत सामना जिंकून दिला.

108-6 : हार्दिक पांड्याने मोसादकचा अडसर केला दूर

हार्दिक पांड्याने षटकार मारून तोरा दाखवणाऱ्या मोसादकला बाद करत बांगलादेशला अजून एक धक्का दिला.

102-5 : बांगलादेशचा निम्मा संघ माघारी 

हार्दिक पांड्याने यासिर चौधरीला 1 धावेवर बाद करत बांंगलादेशला पाचवा धक्का दिला.

अर्शदीप सिंगने कर्णधार शाकिबला केले बाद

अर्शदीपने 12 व्या षटकात हुसैन पाठोपाठ धोकादायक होत असलेला कर्णधार शाकिब अल हसनला देखील 13 धावांवर बाद करत भारताला चौथे यश मिळवून दिले.

अर्शदीपने मिळवून दिले तिसरे यश

अर्शदीप सिंगने अफिफ हुसैनला 3 धावांवर बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले.

84-2 : शमीने शांतोला केलं बाद

लिटन दास बाद झाल्यानंतर मोहम्मद शमीने दुसरा सलामीवीर नजमुल हुसैने शांतोला 21 धावांवर बाद करत बांगलादेशला दुसरा धक्का दिला.

68-1 : राहुलचा गोल्डन आर्म! 

केएल राहुलने फलंदाजीपाठोपाठ क्षेत्ररक्षणातही चांगली कामगिरी करून दाखवली. त्याने 27 चेंडूत 60 धावा चोपणाऱ्या लिटन दासला धावबाद करत भारताला मोठा दिलासा दिला.

दिलासा! खेळ पुन्हा सुरू होणार

पावसाने उसंत घेतल्यामुळे सामना भारतीय वेळेनुसार 4.50 मिनिटांनी सामना पुन्हा सुरू होणार आहे. बांगलादेशला डीएलएस नियमानुसार आता नवं टार्गेट मिळालं आहे. त्यांना 16 षटकात 151 धावा करायच्या आहेत. सध्या बांगलादेश 7 षटकात बिनबाद 66 धावांवर आहे. म्हणजे बांगलादेशला आता 54 चेंडूत 85 धावा कराव्या लागणार आहेत.

दिलासा! कव्हर्स हटवले

पावसाच्या वत्ययानंतर ग्राऊंडवरील कव्हर्स आता हटवण्यात आले आहेत. तसेच मैदानावरील पाणी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र खेळपट्टीवरील कव्हर्स अजून काढण्यात आलेले नाहीत.

पावसामुळे बांगलादेशची चांदी?

बांगलादेश डकवर्थ लुईस नियमानुसार टार्गेटच्या 17 धावा पुढे आहे. डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे बांगलादेशला 7 षटकात 49 धावा करणे गरजेचे होते. मात्र बांगलादेशने 7 षटकात 66 धावा ठोकल्या आहेत. जर पावसामुळे पुढचा सामना झाला नाही तर बांगलादेशला विजयाची संधी आहे.

आता पावसाचा खेळ सुरू 

बांगलादेशचा सलामीवीर लिटन दासने धडाकेबाज फलंदाजी करत 26 चेंडूत 59 धावा ठोकल्या. या खेळीच्या जोरावर बांगलादेशने 7 षटकात 66 धावांपर्यंत मजल मारली होती. तेवढ्यात पावसाने आपला खेळ सुरू केला. काही क्षणांसाठी पावसाची मोठी सर आली आणि खेळ थांबला.

BAN 44/0 (5) : बांगलादेशची धडाकेबाज सुरूवात 

भारताचे 185 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशने दमदार सुरूवात केली. सलामीवीर लिटन दासने आक्रमक अवतार धारण केला. त्याने 19 चेंडूत नाबाद 41 धावा ठोकल्या. बागंलादेशने 5 षटकात बिनबाद 44 धावा केल्या.

184-6 (20 Ov) : अश्विनची शेवटच्या षटकात फटकेबाजी

अश्विनने विराट कोहलीला शेवटच्या षटकात चांगली साथ दिली. भारताने 20 षटकात 4 बाद 184 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीने 44 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या.

150-5 : दिनेश कार्तिक झाला धावबाद 

विराट कोहलीने अर्धशतक ठोकत भारताला 17 व्या षटकात 150 चा टप्पा पार करून दिला. मात्र त्यानंतर लगेचच दिनेश कार्तिक 5 चेंडूत 7 धावा करून तो धावबाद झाला.

विराटचे झुंजार अर्धशतक 

भारताची टॉप ऑर्डर पॅव्हेलियनमध्ये पोहचल्यानंतर विराट कोहलीने झुंजार अर्धशतक करत भारताला 150 चा टप्पा पार करून दिला.

130-4  : हार्दिक पांड्या देखील आल्या पावली परतला 

सूर्यकुमार बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्यावर डाव पुढे नेण्याची जबाबदारी होती. मात्र हसन महमुदने त्याला 5 धावांवर बाद करत भारताला चौथा धक्का दिला.

116-3  : सूर्याची छोटेखानी खेळी संपली

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने भारताचा अव्वल टी 20 फलंदाज सूर्यकुमार यादवचा त्रिफळा उडवत भारताला तिसरा धक्का दिला. सूर्यकुमार यादवने 16 चेंडूत 30 धावांची खेळी केली.

78-2 : केएल राहुल फॉर्ममध्ये परतला आणि माघारीही फिरला

गेल्या तीन सामन्यात 4, 9 आणि 9 धावा करणाऱ्या केएल राहुलने 31 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. मात्र अर्धशतकाचा हा आनंद त्याला फारकाळ साजरा करता आला नाही. शाकिब अल हसनने त्याला 50 धावांवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला.

IND 30/1 (5) : विराट - राहुल आक्रमक

बांगलादेशविरूद्ध पॉवर प्लेमध्ये सावध सुरूवात करणाऱ्या केएल राहुलने आपला गिअर बदलला. तर विराट कोहलीने आल्या आल्या दोन चौकार मारून भारताची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला.

11-1 : रोहित शर्मा 2 धावा करून माघारी

हसन महमुदने रोहित शर्माला 2 धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला.

दोन्ही संघात एक बदल

भारत आणि बांगलादेशने आपल्या संघात एक एक बदल केला आहे. बांगलादेशने सौम्या सरकारला संघात स्थान दिलेले नाही. तर भारताने आपल्या संघात एक बदल करून दीपक हुड्डाच्या जागी अक्षर पटेलला पुन्हा संघात स्थान दिले आहे.

बांगलादेशने नाणेफेक जिंकली

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

India vs Bangladesh T20 World Cup 2022 : पावसामुळे अतिरंजक झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 5 धावांनी पराभव करत आपले सेमी फायनलचे तिकिट फिक्स केले. पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशसमोर 16 षटकात विजयासाठी 151 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. मात्र बांगलादेशला 16 षटकात 145 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून हार्दिक पांड्याने 2 तर अर्शदीप सिंगने 2 विकेट घेतल्या.

भारताने ठेवलेल्या 185 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने धडाकेबाज सुरूवात केली. सलामीवीर लिटन दासने भारताच्या गोलंदाजींच्या चिंधड्या उडवून देत संघाला 7 षटकात 66 धावांपर्यंत पोहचवले. यात लिटन दासच्या एकट्याचे नाबाद 59 धावांचे योगदान आहे. दुसरा सलामीवीर नजिमुल हुसैन शांतोने 16 चेंडूत नाबाद 7 धावा केल्या आहेत. दरम्यान, सात षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. त्यामुळे सामना थांबला.

पावसाने उसंत घेतल्यामुळे सामना भारतीय वेळेनुसार 4.50 मिनिटांनी सामना पुन्हा सुरू झाला. बांगलादेशला डीएलएस नियमानुसार आता 6 षटकात 151 धावांच नवं टार्गेट मिळालं. पावसामुळे खेळ थांबला त्यावेळी बांगलादेश 7 षटकात बिनबाद 66 धावांवर होता. म्हणजे बांगलादेशला आता 54 चेंडूत 85 धावा कराव्या लागणार होत्या.

सामना इथं फिरला

दरम्यान, खेळ सुरू झाल्या झाल्या केएल राहुलने धोकादायक लिटन दासला 60 धावांवर धावबाद केले. लिटन दास बाद झाल्यानंतर मोहम्मद शमीने दुसरा सलामीवीर नजमुल हुसैने शांतोला 21 धावांवर बाद करत बांगलादेशला दुसरा धक्का दिला. बांगलादेशचे दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर कर्णधार शाकिबने धुरा खांद्यावर घेत सामना 30 चेंडूत 54 धावा असा आणला.

मात्र अर्शदीपने अफिफ हुसैनला 3 धावांवर बाद करत बांगलादेशला तिसरा धक्का दिला. याच षटकात अर्शदीपने कर्णधार शाकिबला 13 धावांवर बाद करत बांगलादेशला मोठा धक्का दिला. पाठोपाठ हार्दिक पांड्याने चौधरीला बाद करत बांगलादेशचा पाचवा फलंदाज माघारी धाडला. याचबरोबर मोसादकला देखील याच षकात बाद करत सामना 18 चेंडूत 43 धावा असा आला.

- अर्शदीपने 14 व्या षटकात 12 धावा दिल्या त्यामुळे सामना 12 चेंडूत 31 धावा असा आला.

- 15 वे षटक टाकणाऱ्या हार्दिक पांड्याने टाकले. या षटकात बांगलादेशने एक षटकार आणि एक चौकार मारत 10 धावा केल्या.

शेवटच्या षटकाचा थरार

शेवटच्या 16 व्या षटकात बांगलादेशला विजयासाठी 20 धावांची गरज होती. अर्शदीप सिंगने हे षटक टाकण्याची जबाबदारी उचलली.

1 पहिल्या चेंडूवर 1 धाव

2 दुसऱ्या चेंडूवर सोहानने षटकार मारला, 4 चेंडूत 13 धावांची गरज

3 तिसऱ्या चेंडू निर्धाव तीन चेंडूत 13 धावा

4 चौथ्या चेंडूवर दोन धावा, सामना 2 चेंडू 11 धावा

5 अर्शदीप सिंगने चौकार दिला सामना 1 चेंडू 7 धावा असा आला.

6 शेवटच्या चेंडूवर अर्शदीपने एक धाव देत सामना जिंकून दिला.

तत्पूर्वी, बांगलादेशविरूद्धच्या महत्वपूर्ण सामन्यात रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक ही भारताची मोठमोठी नावं आपल्या लैकिकास साजेसा खेळ करू शकली नाही. अखेर भारताची रन मशिन पुन्हा एकदा भारतासाठी उभी राहिली. विराट कोहलीने 44 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी करत भारताला 184 धावांपर्यंत पोहचवले. सलामीवीर केएल राहुलने देखील यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमधील आपले पहिले अर्धशतक झळकावले. तसेच सलग दोन सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने देखील 16 चेंडूत 30 धावांची आक्रमक खेळी केली. अश्विनने 6 चेंडूत 13 धावा करून शेवटच्या षटकात मोठा हातभार लावला. मात्र या चौघांव्यतिरिक्त इतर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. बांगलादेशकडून हसन महमूदने दमदार गोलंदाजी करत 3 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.