चेन्नई : तीन दिवसांवर आलेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीयांनी आपला सराव अधिकाधिक काटेकोर केला आहे. प्रत्येक खेळाडू कसून मेहनत घेत आहे. शुक्रवार-शनिवारी जोरदार सराव केल्यानंतर भारतीय संघाने रविवारी विश्रांती घेतली आणि आजपासून पुन्हा सरावास सुरुवात केली. मालिकेतील पहिला सामना येत्या गुरुवारपासून सुरू होत आहे.