India vs Bangladesh Toss Update: बांगलादेशने टॉस जिंकून घेतला बॉलिंगचा निर्णय; भारताकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा

India vs Bangladesh toss update: बांगलादेशचे खेळाडू चांगली कामगिरी करण्यासाठी तयार आहेत. मात्र, त्यांच्यासमोर बलाढ्य भारतीय संघ आहे. भारताने घरच्या मैदानात २०१३ पासून कोणतीही मालिका हरलेली नाही.
India vs Bangladesh Test Series
India vs Bangladesh Test Series
Updated on

India vs Bangladesh 1st Test:

बांगलादेशने टॉस जिंकला आहे. पण, बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताला पहिल्यांदा बॅटिंग करण्याची संधी मिळणार आहे. बांगलादेशची ही रणनीती यशस्वी ठरते का? हे पाहावं लागणार आहे.

भारत आणि बांगलादेशमध्ये आज पहिला कसोटी सामना होत आहे. पहिला कसोटी सामना चेन्नईतील चेपॉक येथील एमए चिंदबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. नुकतेच बांगलादेशने कसोटी मालिकेत पाकिस्तानला धूळ चारली होती. त्यामुळे बांगलादेशचे खेळाडू चांगली कामगिरी करण्यासाठी तयार आहेत. मात्र, त्यांच्यासमोर बलाढ्य भारतीय संघ आहे. भारताने घरच्या मैदानात २०१३ पासून कोणतीही मालिका हरलेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.