प्रत्येक पाऊल वर्ल्डकप कडे; भारत-इंग्लंडमध्ये आज पहिला ट्वेन्टी-२० सामना

वर्ल्डकपच्या तयारीचा विचार आहे पण प्रत्येक सामना चांगला खेळ करून जिंकण्याकरताच खेळणार आहोत आम्ही - रोहित
India vs England 1st T20
India vs England 1st T20sakal
Updated on

IND vs ENG: कसोटी पराभवाचे दु:ख मागे टाकून भारतीय संघ तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत उतरणार आहे. बरेच बदल पहिल्या सामन्यात होण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा कोरोनाशी लढून मैदानावर परतणार आहे. कसोटी संघातील बरेच खेळाडू पहिल्या सामन्यात खेळताना दिसणार नाहीत. तसेच पहिल्या सामन्याकरता भारतीय संघाचे प्रशिक्षकपद व्हीव्हीएस लक्ष्मणकडे असेल. आयर्लंडमध्ये दोन टी-20 सामन्यात खेळलेल्या खेळाडूंना पहिल्या टी-20 सामन्यात जास्त संधी असेल.(India vs England 1st T-20)

India vs England 1st T20
कोरोनामधून बरं झालेल्या रोहितने स्पष्टच सांगितलं! 'अभी तो ठीक हूं, पर...'

बुधावारी भारतीय संघाने एजेस बाऊल मैदानावर सराव केला त्या अगोदर रोहित शर्मा संघाबरोबर बराच वेळा बोलताना दिसला. टी-20 वर्ल्डकप अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपला असल्याने भारतीय संघात जागा मिळवायला तरुण खेळाडू धडपडणार आहेत. इंग्लंड संघाचा अगोदरचा कप्तान इयॉन मॉर्गनने निवृत्ती घेतल्याने जोस बटलर कप्तान नात्याने नवी इनिंग चालू करणार आहे. सामन्यादरम्यान साउदम्पटनची हवा चांगली राहण्याचा अंदाज वर्तवला गेल्याने स्थानिक कौंटी संयोजकांमध्ये उत्साह आहे.

पहिल्या सामन्यात डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणण्यापेक्षा टी-20 स्पेशालिस्ट अर्शदिप सिंगला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. दीपक हुडाने गेल्या दोन सामन्यात दाखवलेली चमक त्याचे स्थान मजबूत करत आहे. स्वत: रोहित शर्माला चांगला खेळ करून दाखवायची असलेली इच्छा सरावादरम्यान दिसून आली. इंग्लंड संघातील कप्तान जोस बटलर बरोबर जेसन रॉय आणि लियाम लिव्हींंगस्टोनकडे सगळ्यांचे लक्ष असेल इतके हे तिघे टी-20 क्रिकेटमध्ये सध्या चांगल्या फॉर्मात आहेत.

India vs England 1st T20
Happy Birthday MS Dhoni: क्रिकेटला क्रिकेटपण देणारा माणूस!

या मैदानावर भारतीय संघाचा खेळ अपेक्षेप्रमाणे झालेला नाहीये. वर्ल्ड टेस्ट चॅम्पीयनशिपचा अंतिम सामनाही याच मैदानावर भारताने गमावला होता. तो सगळा निराशाजनक इतिहास पुसून टाकायच्या जिद्दीने भारतीय संघ मैदानात उतरेल. साउदम्पटनला भारतीय संघ एकच सामना खेळणार असल्याने प्रेक्षक कामाचा दिवस असला तरी मैदान भरून टाकतील असा विश्वास संयोजक व्यक्त करत होते.

नव्या खेळाडूंना मोठी संधी : रोहित

वर्ल्डकपच्या तयारीचा विचार आहे पण प्रत्येक सामना चांगला खेळ करून जिंकण्याकरताच खेळणार आहोत आम्ही. तीन टी-20 सामन्यांची मालिका नव्या खेळाडूंना मोठी संधी देणार आहे. इंग्लंडचा संघ खूपच चांगला असल्याने आणि त्यांचे काही खेळाडू उत्तम फॉर्मात असल्याने आमची चांगली परीक्षा बघितली जाईल. इंग्लंडची फलंदाजीची ताकद भारतीय संघ जाणून आहे. भारतीय गोलंदाजीत त्यांना प्रत्युत्तर देण्याची क्षमता आहे. उमरान मलिककडे संघ व्यवस्थापनाचे बारीक लक्ष आहे. नुसताच वर्ल्डकप नव्हे तर वेगवान गोलंदाज म्हणून त्याची योग्य जडणघडण होईल या कडे आम्ही सगळे मिळून लक्ष देणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.