India Vs England Sarfaraz Khan : सरफराज खान दुसऱ्या कसोटीत खेळणार...? प्रशिक्षक स्पष्टच बोलले

India Vs England Sarfaraz Khan
India Vs England Sarfaraz Khanesakal
Updated on

India Vs England Sarfaraz Khan : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा शुक्रवारी (दि. 2) विशाखापट्टणम येथे होणार आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार असून सरफराज खान आणि रजत पाटीदार यांच्यात प्लेईंग 11 मध्ये जागा मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे.

दुसऱ्या कसोटीत रविंद्र जडेजा आणि केएल राहुल मुकणार आहेत. विराट कोहली देखील उपलब्ध नाहीये. अशा परिस्थितीत सरफराज खान, रजत पाटीदार, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा संघात समावेश करण्यात आला.

India Vs England Sarfaraz Khan
Manju Rani : चालण्यात भारी 'मंजू राणी'; 10KM शर्यतीत जिंकले सुवर्णपदक! पॅरिस ऑलिंपिकमध्ये मिळणार संधी?

दरम्यान, भारताचे फलंदाजी प्रशिक्षक राठोड यांनी एक मोठी अपडेट दिली आहे. त्यांना सरफराज खान किंवा रजत पाटीदार खेळणार का असे विचाल्यावर ते म्हणाले की, 'हा खूप अवघड निर्णय आहे. दोघं संघासाठी महत्वाची भुमिका बजावू शकतात का तर हो नक्कीच ते चांगले खेळाडू आहेत. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कशी कामगिरी केली आहे. हे आपण सर्वजण जाणतोच.'

ते पुढे म्हणाले की, 'अशा प्रकारच्या खेळपट्टीवर मला वाटतं की ते एक चांगला पर्याय ठरू शकतात. जर आम्हाला सरफराज आणि रजत यांच्यामधील एकाची निवड करायची असेल तर नक्कीच तो एक अवघड निर्णय असेल. मात्र हा निर्णय राहुल द्रविड आणि रोहित शर्मा घेणार आहे. परिस्थीती पाहून प्लेईंग 11 चा निर्णय घेतला जाईल.

India Vs England Sarfaraz Khan
Vidhu Vinod Chopra Son : विधू विनोद चोप्रांच्या मुलाचा मोठा विक्रम; 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय क्रिकेटपटू

खेळपट्टीबाबत राठोड म्हणाले की, 'इथल्या खेळपट्टीचा अंदाज येणं खूप अवघड आहे. या खेळपट्टीवर चेंडू टर्न होईल. पहिल्या दिवसापासून नाही मात्र नंतर चेंडू टर्न घेईल हे नक्की. सध्या तरी खेळपट्टीचं नेचर असच वाटत आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.