India vs England 3rd odi : इंग्लंडमधील अतिगरम हवेने संयोजक अडचणीत आले आहेत. खेळपट्टीमधील पाण्याचा अंश टिकवून ठेवायला धडपडत आहेत. सामन्याच्या दिवशी म्हणजे रविवारी ३१ अंश सेल्सिअस गरम तापमान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच गरम हवेचा खेळपट्टीवर काय परिणाम होतो आणि खेळाडूंना काय त्याचा त्रास होतो, याचा अंदाज लागत नाहीये. एक नक्की आहे, उन्हाचे कितीही चटके बसणार असले, तरी क्रिकेटवेडे प्रेक्षक तिसऱ्या आणि निर्णायक सामन्याकरिता ओल्ड ट्रॅफोर्ड मैदान भरून टाकणार आहेत. (India vs England 3rd odi One Day Series Today Decisive Match)
ओल्ड ट्रॅफोर्ड मैदान फलंदाजांची कमी लाड करते, असे इतिहास सांगतो. जिम लेकर या महान गोलंदाजाने याच मैदानावर एका कसोटी सामन्यात १९ बळी घेण्याचा चमत्कार केला होता. दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांना इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी जेरीस आणले होते. तिसरा आणि निर्णायक सामना जिंकायचा झाल्यास फलंदाजांना कामगिरीत लक्षणीय सुधारणा करावी लागेल. खास करून सुरुवातीच्या काही षटकांत कसेही करून विकेट जाऊन चालणार नाही.
ओल्ड ट्रॅफोर्डची खेळपट्टी भरपूर रोलिंग करून आणि गवत छाटून तयार केली गेली आहे. सततच्या कडक उन्हापासून बचाव करायला खेळपट्टीवर पातळ आच्छादन टाकले गेलेले सामन्याच्या आदल्या दिवशी दिसले.
शनिवारी संपूर्ण भारतीय संघाने जोरदार सराव केला. युझवेन्द्र चहल खेळपट्टीपासून सीमारेषा किती लांब आहे, याचा अंदाज घेत होता; तर रिषभ पंत राहुल द्रविडशी बॅटिंगची चर्चा करताना दिसला. मैदानाचा एक भाग प्रेक्षकांकरिता बंद आहे. कारण नवीन स्टॅन्ड उभारण्याचे काम जोरात चालू आहे. परिणामी तिकीट हाती लागलेल्या फक्त १७ हजार नशीबवान प्रेक्षकांना सामना प्रत्यक्ष मैदानात अनुभवता येईल. रविवारचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० ला सुरू होणार आहे.
विराटकडे अखेरची संधी?
दोन्ही संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे. विराट कोहलीची तिसरा सामना महत्त्वाचा असेल कारण नंतर होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर तो जाणार नाहीये. क्रिकेटमधील नशिबाचे दरवाजे त्याच्याकरिता कधी उघडतात याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे.(Eng vs Ind Virat Kohli last chance)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.