India vs England T20 CWG 2022 : अतिशय चुरशीच्या सामन्यात आणि अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने यजमान इंग्लंडचा चार धावांनी पराभव करून राष्ट्रकुल महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे सुवर्ण किंवा रौप्यपदक निश्चित झाले.
नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय स्मृती मानधनाने सार्थ ठरवला होता. तुफानी टोलेबाजी करून मानधनाने गोलंदाजांना धारेवर धरले होते. साडेचार षटकांत अर्धशतकी भागीदारी नोंदवली गेली. यात शेफाली वर्माच्या ५ धावा होत्या. मानधनाचे अर्धशतक २३ चेंडूंत ८ चौकार २ षटकारांसह पूर्ण झाले. भारत खूप मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्यात असताना मानधना (६१ धावा) आणि शेफाली वर्मापाठोपाठ बाद झाल्या. त्यानंतर इंग्लिश गोलंदाजांनी उचल खाल्ली आणि टिच्चून मारा केला. मधल्या फळीत जेमिमा रॉड्रिग्सचे नाबाद ४४ धावांचे योगदान मौल्यवान ठरले. २० षटकांत ५ बाद १६४ धावा उभारता आल्या.
इंग्लंडच्या फलंदाजांनीही आक्रमक मार्ग स्वीकारला. डॅनी वाईटने रेणुका सिंगच्या २ षटकांत मोठ्या धावा चोपून काढल्या. रेणुकाला यश न मिळाल्याचा मोठा परिणाम झाला. गोलंदाजांपेक्षा चांगली फिल्डिंग कमी आली. इंग्लंडच्या ३ महत्त्वाच्या फलंदाज धावबाद झाल्या. जबरदस्त फटकेबाजी करणाऱ्या वाईटला परत तंबूत पाठवण्यात यश आल्याने जिवात जीव आला. एका क्षणाला भारताचा आणि इंग्लंडचा धावफलक ३ बाद ११३ चे समान चित्र दाखवत होता. स्कायवर आणि जोन्सने मोलाची भागीदारी करून सामन्यात जान आणली. जोन्स धावबाद झाल्याने सामना परत फिरला. शेवटच्या २ षटकांत २७ धावा करायच्या असताना लक्ष स्कायवर होते.
शेवटच्या षटकाचा संपूर्ण थरार -
19.1 षटके - 0 धावा
19.2 षटके - 1 धाव
19.3 षटके - आऊट
19.4 षटके - 1 धाव
19.5 षटके - 1 धाव
19.6 षटके - 6 धावा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.