IND vs ENG : इंग्लंड मालिकेसोबत 'या' खेळाडूची कारकीर्दही संपली?

इंग्लंडविरुद्ध कसोटी संपल्यानंतर टीम इंडियाच्या आनखी एका खेळाडूची कारकीर्दही शेवटच्या दिशेने जात
shubman gill career may get over ind vs eng
shubman gill career may get over ind vs eng sakal
Updated on

India vs England 5th Test : एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडिया विजयाची सर्वात मोठी दावेदार मानली जात होती. पण शेवटच्या सामन्यात 7 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघाचे इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. कसोटी संपल्यानंतर टीम इंडियाच्या आनखी एका खेळाडूची कारकीर्दही शेवटच्या दिशेने जात आहे.

shubman gill career may get over ind vs eng
IND vs ENG: पराभवानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडचे धक्कादायक विधान

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलची कारकीर्दही संपुष्टात येताना दिसत आहे. गिलची कामगिरी काही काळापासून चांगली दिसत नाही. या खेळाडूला आतापर्यंत एकही शतक झळकावता आलेले नाही. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज गिलची कसोटी कारकीर्द वयाच्या 22 व्या वर्षी संपेल असे दिसत आहे.(shubman gill career may get over ind vs eng)

shubman gill career may get over ind vs eng
Wimbledon: पहिले दोन सेट गमावल्यानंतर जोकोविचने जिंकला सामना; 11व्यांदा उपांत्य फेरीत

भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोघेही या कसोटी सामन्यात खेळले नाहीत. अशा परिस्थितीत शुभमन गिलला चेतेश्वर पुजारासोबत ओपनिंगसाठी मैदानात उतरवले होते. शुभमन गिलला या सुवर्णसंधीचा फायदा घेता आला नाही. बर्मिंगहॅम कसोटीच्या पहिल्या डावात त्याला अवघ्या 17 धावा करता आल्या. दुसऱ्या डावात शुभमन गिलची अवस्था आणखीनच वाईट झाली, 4 धावा करत तो बाद झाला. या फ्लॉप कामगिरीमुळे शुभमन गिलने भारतीय संघाच्या विश्वासाला तडा दिला आहे असं वाटत आहे. त्याने भविष्यात कसोटी संघाचे दरवाजे स्वत:साठी जवळपास बंद केले आहेत.

shubman gill career may get over ind vs eng
Cricket Record | भारत - इंग्लंड सामन्यात रेकॉर्ड अन् माईलस्टोनचा 'पाऊस'

टीम इंडियाला दमदार सुरुवात करून देण्याची जबाबदारी शुभमन गिलच्या खांद्यावर होती, मात्र गिल हे आव्हान पेलू शकलेला नाही. रोहितसोबत पुन्हा एकदा केएल राहुल डावाची सुरुवात करताना दिसल. एजबॅस्टन कसोटीत टीम इंडियाचा 7 विकेट्सनी पराभव झाला. टीम इंडियाने इंग्लंडसमोर हा सामना जिंकण्यासाठी 378 धावांचं लक्ष्य दिलं होतं. इंग्लंडने हे लक्ष्य केवळ 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.