पंतचा पत्ता होणार कट? 'विराट' पराभवानंतर कोहलीची प्रतिक्रिया

इंग्लंड दौऱ्यातील आतापर्यंतच्या सामन्यात पंत अडखळत खेळताना दिसतोय.
rishabh pant
rishabh pantAFP
Updated on

लीड्सच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला 76 धावा आणि डावाने पराभवाची नामुष्की ओढावली. तिसऱ्या डावातील पराभनवाचे मुख्य कारण हे भारतीय संघातील आघाडीच्या फलंदाजांनी पहिल्या डावात केलेली खराब कामगिरी हेच होते. नावजलेल्या खेळाडूंच्या या यादित ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दिमाखदार कामगिरीने हिरो ठरलेला रिषभ पंतच्या नावाचाही समावेश आहे. इंग्लंड दौऱ्यातील आतापर्यंतच्या सामन्यात तो अडखळत खेळताना दिसतोय. तिसऱ्या कसोटीतील दोन्ही डावात तो इंग्लंडच्या फिल्डर्संना कॅचिंग प्रॅक्टिस देत असल्याच्या तोऱ्यात आउट झाला. तिसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियात मोठे बदल दिसू शकतात. यासह पंतला संधी मिळणार का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. कोहलीने यावर भाष्यही केले आहे.

पंतसदर्भात नेमकं काय म्हणाला कोहली

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला पुढील सामन्यात पंतला खेळवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर कोहलीने पंतचे समर्थन केले. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यात 23 वर्षीय पंतने नॉटिंघममध्ये 25, लॉर्ड्स 37 आणि 22 धावा आणि लीड्सच्या मैदानात 2 आणि 1 अशी धावसंख्या केली. आतापर्यंत त्याने केवळ 84 धावा काढल्या आहेत. त्यामुळेच त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवाला कोणी एकजण जबाबदार नाही.

rishabh pant
Paralympics : भारताला रौप्य; Sports Day ला भाविनाची चंदेरी कामगिरी

एक टीम म्हणून आम्ही अपयशी ठरलोय. पुढील सामन्यातही रिषभ पंतला संधी निश्चितच मिळेल, असे कोहली व्हर्चुअल पत्रकार परिषदेत म्हणाला. यावेळी कोहलीने पुजाराची पाठराखणही केल्याचे पाहायला मिळाले. चेतेश्वर पुजारासंदर्भातही असेच बोलले जात आहे. तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात त्याची खेळी पाहून सर्व शांत झाले आहेत, असा टोलाही त्यांनी खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणाऱ्यांना लगावला.

नेहमीच आकड्यावर खेळाडूंची क्षमता ठरवू नका

एखाद्या फलंदाजाने किती धावा केल्या त्याच्या आकडेवारीवरुन नेहमी त्याचे यश मोजले जात नाही. टीम म्हणून आम्ही तसा विचारही करत नाही. मालिकेत आणखी दोन सामने बाकी आहेत. चुका सुधारून आम्ही पुन्हा दमदार खेळी करायला सज्ज आहोत, असेही कोहली यावेळी म्हणाला.

rishabh pant
IND vs ENG : रहाणेमुळे कोहलीची फिफ्टी झाली, पण...

पुजाराचे कौतुक

पुजाराने तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात 91 धावांची खेळी केली. त्याची ही खेळी टीम इंडियाला पराभवाच्या खाईतून बाहेर काढण्यास पूरक ठरली नाही. पण कोहलीने पुजाराच्या खेळीवर समाधान व्यक्त केले. तो म्हणाला की, लोक काय बोलत आहेत याचा विचार न करता संघाच्या हितासाठी आवश्यक ते प्रयत्न पुजाराने केले, असे म्हणत कोहलीने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()