India vs England Women : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी आजपासून आपली अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यामधील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून होव येथे सुरुवात होणार आहे. या प्रसंगी भारतीय संघातील सहकारी झुलन गोस्वामी हिच्या कारकीर्दीचा शेवट गोड करण्यासाठी मैदानात शर्थीचे प्रयत्न करताना दिसतील. ही मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सर्वस्व पणाला लावेल यात शंका नाही.
आता आजपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला फलंदाजी व क्षेत्ररक्षण या दोन्ही बाबींमध्ये कमालीची सुधारणा करावी लागणार आहे.
हरमन, स्मृतीवर मदार
स्मृती मानधना व हरमनप्रीत कौर या दोघांच्या खांद्यावर भारतीय संघाची फलंदाजीची मदार अवलंबून असणार आहे. जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दयालन हेमलता यांनाही जबाबदारी ओळखून खेळ करावा लागणार आहे. स्नेह राणा, दीप्ती शर्मा या अष्टपैलू खेळाडूंनाही दबावाखाली खेळ उंचवावा लागेल.
भारतीय महिला संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), सिमरन बहादूर, यास्तिका भाटिया, तानिया भाटिया, हर्लीन देओल, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, दयालन हेमलता, एस. मेघना, मेघना सिंग, स्नेह राणा, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार.
इंग्लंडचा महिला संघ- एमी जोन्स, टॅमी ब्यूमोंट, लॉरेन बेल, मेया बाऊचीयर, एलीस कॅपसी, केट क्रॉस, फ्रेया डेव्हीस, एलीस डेव्हीडसन, चार्ली डीन, सोफीया डंकली, सोफी एक्लेस्टोन, फ्रेया केम्प, आयसी वोंग, डॅनी वॅट.
आजची पहिली वन डे लढत - भारत-इंग्लंड, होव
दुपारी ३.३० वाजता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.