India vs Germany hockey series 2024 : पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेस मुकलेल्या वरुण कुमारचा भारतीय हॉकी संघात पुन्हा समावेश करण्यात आला आहे. ज्युनियर महिला व्हॉलीबॉल खेळाडूने वरुण कुमारवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता, त्यामुळे त्याला ऑलिंपिक संघात स्थान मिळाले नव्हते. जर्मनीविरुद्ध २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दोन हॉकी कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिन्यात बंगळूरू पोलिसांनी वरुणवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातून मुक्तता झाल्यामुळे त्याची भारतीय संघात निवड झाल्याचे भारतीच हॉकी संघातील सूत्रांनी सांगितले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीतकडे कायम असणार आहे. विवेकसागर प्रसाद हा उपकर्णधार असेल. हार्दिक सिंगचा मात्र संघात समावेश झालेला नाही.