India vs Germany: कांस्य पदक विजेत्या भारतासमोर आता रौप्यपदक पटकावणाऱ्या जर्मनीचे आव्हान

India vs Germany Hockey Series in New Delhi: नवी दिल्लीत पुढील महिन्यात दोन हॉकी सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
India vs Germany
India vs Germanyesakal
Updated on

India vs Germany hockey match: पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक पटकावणारा जर्मनीचा हॉकी संघ व कांस्यपदक पटकावणारा भारताचा हॉकी संघ ऑक्टोबर महिन्यात दोन सामन्यांसाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारत-जर्मनी यांच्यामध्ये नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये २३ व २४ ऑक्टोबरदरम्यान लढतींचा थरार रंगणार आहे.

पॅरिस ऑलिंपिकमध्ये जर्मनी-भारत यांच्यामध्ये उपांत्य फेरीची लढत पार पडली. यामध्ये जर्मनीच्या संघाने ३-२ असा विजय संपादन केला. या लढतीतील पराभवामुळे भारताला ब्राँझपदकासाठीच्या लढतीत स्पेनशी लढावे लागले. हरमनप्रीतच्या भारतीय संघाने स्पेनला पराभूत करीत ब्राँझपदक पटकावले, तसेच नेदरलँड्‌सकडून पराभूत झाल्यामुळे जर्मनीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की याप्रसंगी म्हणाले, दोन सामन्यांच्या आयोजनाने भारत व जर्मनी या दोन देशांमधील संबंध आणखी चांगले करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दोन देशांमधील खेळाडूंचा अव्वल दर्जाचा खेळ या मालिकेने तमाम हॉकीप्रेमींना पाहता येणार आहे. जगातील दोन दिग्गज संघांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

India vs Germany
Carrom Tournament: ज्युनियर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे चारही संघ सज्ज

कडव्या संघर्षासाठी सज्ज

जर्मनी हॉकी संघटनेचे अध्यक्ष हेनिंग फास्ट्रीच याप्रसंगी म्हणाले, भारतामध्ये हॉकी या खेळाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. त्यामुळे भारतातील हॉकी या खेळावर प्रेम करणाऱ्या क्रीडाप्रेमींसमोर खेळण्यासाठी आमचा संघ इच्छुक आहे. या मालिकेने आगामी स्पर्धांसाठीही सज्ज होता येणार आहे. भारतीय संघाकडून मिळणाऱ्या कडव्या संघर्षासाठी आम्ही सज्ज असणार आहोत. मेजर ध्यानचंद या ऐतिहासिक राष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्याची उत्सुकताही कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.