Ire vs Ind 3rd T20 : सलग दोन विजयानंतरही टीम इंडियात होणार मोठं बदल, 'या' राखीव खेळाडूंना संधी मिळणार?

IND vs IRE T20
IND vs IRE T20
Updated on

India vs Ireland 3rd T20 : आयर्लंडविरुद्धची मालिका सलग दोन विजयांमुळे खिशात टाकलेली असल्यामुळे आता आज होणाऱ्या अखेरच्या सामन्यात राखीव खेळाडूंना मैदानात उतरवण्याची संधी भारतीय संघाला मिळाली आहे. त्यामुळे आगामी आशिया स्पर्धेसाठी या खेळाडूंना सामन्याचा सराव मिळू शकेल.

जसप्रीत बुमरा आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा मॅच फिटनेस आणि फॉर्म या दोन्ही गोष्टी पहिल्या दोन सामन्यांतून सिद्ध झाल्यामुळे दोघांवरचे दडपण दूर झाले त्याचबरोबर मालिकेतही २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता तिसरा सामना हा आशिया क्रीडा स्पर्धेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

IND vs IRE T20
Asia Cup 2023 : 'अगोदरच्या लौकिकापेक्षा खेळाडूंचा सध्याचा फॉर्म...', संघ निवडीनंतर गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य

बुमरा विश्रांती घेणार?

आशिया करंडक आणि त्यानंतर होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेसाठी बुमरा अतिशय महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे. जवळपास वर्षभरानंतर तो मैदानात उतरला आणि पूर्ण जोशात गोलंदाजी करून पूर्वीचाच बुमरा असल्याचे त्याने दाखवून दिले. आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेत उपकर्णधार असलेला ऋतुराज गायकवाड आशिया क्रीडा स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे. त्यापूर्वीच नेतृत्वाचा सराव म्हणून उद्याच्या सामन्यात बुमरा विश्रांती घेऊ शकतो आणि ऋतुराज कर्णधार होऊ शकतो.

आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील राखीव राहिलेले जितेश शर्मा, आवेश खान, मुकेश कुमार आणि शाहबाझ अहमद हे हांगझाऊ येथील आशिया क्रीडा स्पर्धेतील संघात आहेत. त्यामुळे त्यांनाही उद्या संधी दिली जाऊ शकते. यातील यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माची निवड जवळपास निश्चित वाटत आहे. संजू सॅमसन वेस्ट इंडिज दौऱ्यातून खेळत आहे; तसेच आता त्याची आशिया करंडक स्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. परिमाणी उद्याच्या सामन्यात जितेश शर्मा यष्टिरक्षण करताना दिसू शकेल.

बुमरा किंवा प्रसिद्ध कृष्णा यापैकी एकाने विश्रांती घेतली, तर आवेश खानची निवड निश्चित आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यापासून तो सलग सात सामने राखीव राहिलेला आहे. आशिया क्रीडा स्पर्धेपूर्वी फॉर्म मिळवण्यासाठी त्याला उद्याच्या सामन्यात खेळवण्यात येऊ शकते. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची कामगिरी चढ-उतारासारखी झाली आहे; पण त्याचीही निवड आशिया क्रीडा स्पर्धेच्या संघात असल्यामुळे त्याला आणखी एक संधी जाऊ शकते.

IND vs IRE T20
Badminton WC2023 : सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बाहेर! भारताच्या लक्ष्य, प्रणॉयची आगेकूच

फलंदाजीत सॅमसनऐवजी जितेश शर्मा या बदलाचा अपवाद वगळता आणखी बदल होण्याची शक्यता नाही. यशस्वी जयस्वाल आणि रिंकू सिंग महत्त्वाचे फलंदाज असतील. यातील रिंकू सिंगने गेल्या सामन्यात २१ चेंडूत ३८ धावांची खेळी करून आपली क्षमता दाखविली आणि निवड समितीचा विश्वासही सार्थ ठरवला.

तिलककडून अपेक्षा

सर्व माजी दिग्गज खेळाडूंकडून कौतुक होत असलेल्या तिलक वर्माला आशिया करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले; परंतु आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेत तो अपयशी ठरला आहे. पहिल्या सामन्यात भोपळा, तर दुसऱ्या सामन्यात अवघी एक धाव त्याला करता आली होती. संघ निवडीचे आता कोणतेही दडपण नसल्यामुळे उद्या तो पहिल्या दोन्ही सामन्यांची भरपाई करेल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.