India vs Ireland 3rd T20I : भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी 20 मालिका आता शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा उद्या (दि. 23) डब्लिंग येथे खेळवला जाणार आहे. भारताने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत 2 -0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
मालिका आधीच खिशात टाकली असल्याने जसप्रीत बुमराह हा तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल करून बेंचवर असलेल्या खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. विकेटकिपर जितेश शर्मा आणि शाहबाज अहमद यांना टी 20 पदार्पण करण्याची संधी देखील आहे.
तसेच मुकेश कुमार आणि आवेश खान यांना देखील मालिकेत एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. ही संधी तिसऱ्या टी 20 सामन्यात मिळू शकते. मात्र पाऊस सामन्यात व्यत्यय आणू शकतो त्यामुळे या खेळाडूंना संधीचं सोनं करण्याच अडथळा निर्माण होऊ शकतो.
वेगवान गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी
डब्लिंगची खेळपट्टी ही फलंदाजांसोबतच वेगवान गोलंदाजांना देखील साथ देणार असणार आहे. खेळपट्टीवर गवत आहे तसेच पावसामुळे या खेळपट्टीत थोडा ओलावा देखील असण्याची शक्यता आहे. मात्र फलंदाज सेट झाल्यानंतर चांगल्या प्रकारे धावा करू शकतात. या खेळपट्टीवर 180 च्या पार धावा होऊ शकतात.
पावसाचा व्यत्यय
आयर्लंड विरूद्धच्या मालिकेत पहिल्या सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. पहिल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल लागला होता. दुसऱ्या सामन्यात पावसाचा व्यत्य आला नाही. मात्र आता तिसऱ्या सामन्यात पावसाची दाट शक्यता आहे.
met office gov या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी डब्लिंग येथे पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. सामना हा आयर्लंडच्या वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे. या दिवशी सायंकाळी 5 ते 6 वाजता पाऊस पडण्याची शक्यात 50 टक्के इतकी आहे.
याचा अर्थ तिसऱ्या सामन्यात पाऊस खेळ बिघडवू शकतो. भारताला आयर्लंडविरूद्ध क्लीन स्विपची परंपारा कायम राखायची आहे. मात्र पाऊस भारताचे हे मनसुबे उधळवून लावू शकतो.
जसप्रीत बुमराह, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैसावल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन, जितेश शर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्वोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.