भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा घोषणा करण्यात आली आहे. 17 खेळाडूंच्या या संघात राहुल त्रिपाठी आणि संजू सॅमसन या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, तर काही खेळाडूकडे दुर्लक्षित करण्यात आले आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी हार्दिक पांड्याला कर्णधारपद देण्यात आले आहे. गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा अष्टपैलू राहुल तेवतियाची निवड झाली नाही. टीम इंडियाची निवड न झाल्याने तेवतिया नाराज झाला आहे.(india vs ireland rahul tewatia heartbroken)
राहुल तेवतियाने ट्विटरवर आपले दुःख व्यक्त केले. त्यांनी दोन शब्दात आपली व्यथा मांडली आहे. तेवतिया यांनी ट्विटरवर लिहिले 'Expectations hurts'. राहुल तेवतियाने IPL 2022 मध्ये गुजरातसाठी फिनिशरची भूमिका चांगली बजावली होती. त्याने 16 सामन्यात 147.62 च्या स्ट्राईक रेटने 217 धावा केल्या. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात तेवतियाने शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता.
1 जुलैपासून भारताला इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळायचा आहे.यामुळे 26 आणि 28 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-20 सामन्यात वरिष्ठ खेळाडू भाग घेऊ शकणार नाहीत.निवड समितीने या दौऱ्यासाठी हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिले आहे, तर भुवनेश्वर कुमारकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून चमकदार कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीचा पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी सॅमसन आणि राहुल त्रिपाठी यांची संघात निवड न केल्याने बीसीसीआयवर लोकांनी टीका केली होती. आयपीएल 2022 मध्ये सॅमसनने 17 सामन्यांमध्ये 146.79 च्या स्ट्राइक रेटने 458 धावा केल्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचवेळी राहुल त्रिपाठीने 14 सामन्यात 158.23 च्या स्ट्राईक रेटने 413 धावा केल्या. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.