India Vs Ireland : इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार! भारताची मालिका 'या' वाहिनीवर पहिल्यांदाच लाईव्ह दिसणार

India Vs Ireland Sports18
India Vs Ireland Sports18 esakal
Updated on

India Vs Ireland Live Streaming : भारतीय संघ 18 ऑगस्टपासून आयर्लंड दौऱ्यावर तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेचे प्रसारण हक्क व्हायकॉम 18 ला मिळाले आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच स्पोर्ट्स 18 वर भारताच्या क्रिकेट मालिकेचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

यापूर्वी आयपीएल आणि महिला प्रीमियर लीगचे प्रसारण हक्क व्हायकॉम 18 ला मिळाले होते. मात्र त्यांना यापूर्वी कोणत्याही भारताच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यांनी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग केलं होतं. मात्र ते फक्त जिओ सिनेमावरच उपलब्ध होतं. त्यांनी फॅनकोडशी लायसन्सिंग डील केली होती.

India Vs Ireland Sports18
The Hundred Womens : नाद खुळा बाऊन्स बॅक! विजयासाठी 5 चेंडू 8 धावा... शबनमचा हॅट्ट्रिक कारनामा!

व्हायकॉम 18 ने या कराराची अधिकृतरित्या घोषणा आज केली. भारत आणि आयर्लंड विरूद्धची तीन टी 20 सामन्यांची मालिका ही फक्त स्पोर्ट्स 18 वरून टेलिकास्ट होणार आहे. तर याचं लाईव्ह स्ट्रिमिंग हे जिओ सिनेमावरून होणार आहे.

भारताचा पूर्णवेळ टी 20 कर्णधार हार्दिक पांड्याला आशिया कप 2023 पूर्वी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या संघाचे नेतृत्व हे जसप्रीत बुमराह करणार आहे. तो जवळपास वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन करत आहे.

ऋतुराज गायकवाड हा एशियन गेम्समध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे. तो आयर्लंड दौऱ्यावर जसप्रीत बुमराहचा डेप्युटी असेल. याचबरोबर प्रसिद्ध कृष्णा देखील दुखापतीनंतर पहिल्यांदाच खेळणार असून तो भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात आपली दावेदारी ठोकेल.

India Vs Ireland Sports18
India vs Japan Hockey : भारत - जपान सेमीफायन केव्हा, कुठं अन् कधी पहायची लाईव्ह... जाणून घ्या एका क्लिकवर

आयर्लंड विरूद्धची तीन टी 20 सामन्यांची मालिका ही आशिया कप 2023 चा सराव म्हणून म्हणून पाहिली जात आहे. या मालिकेत जसप्रीत बुमराहचा सराव

The 3-match T20 series will serve as the practice for Asian Games 2023 squad as well as Jasprit Bumrah. Ruturaj Gaikwad who will lead India in the Asian Games will be the deputy in the series. The likes of Prasidh Krishna who is also in the running for World Cup and Asia Cup spot will be returning from injuries.

Team India (Senior Men) squad for T20I series against Ireland: Jasprit Bumrah (C), Ruturaj Gaikwad (VC), Yashasvi Jaiswal, Tilak Varma, Rinku Singh, Sanju Samson (wk), Jitesh Sharma (wk), Shivam Dube, Washington Sundar, Shahbaz Ahmed, Ravi Bishnoi, Prasidh Krishna, Arshdeep Singh, Mukesh Kumar, Avesh Khan

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.