IRE vs IND : भारत विरूद्ध आयर्लंड सामना कधी अन् कोठे पहाल?

India vs Ireland When And Where To Watch Live Match Update Time Venue
India vs Ireland When And Where To Watch Live Match Update Time VenueESAKAL
Updated on

नवी दिल्ली : भारताचे दोन संघ सध्या युरोपात आहेत. कसोटी संघ इंग्लंडमध्ये सराव सामना खेळत आहे. तर भारताचा टी 20 संघ आयर्लंड दौऱ्यावर आहे. रविवारी 26 जूनला भारताचा टी 20 संघ आयर्लंडविरूद्धचा आपला पहिला सामना खेळणार आहे. तर कसोटी संघ सध्या लिसेस्टरशायर विरूद्ध सराव सामना खेळत आहे. (India vs Ireland When And Where To Watch Live Match Update Time Venue)

India vs Ireland When And Where To Watch Live Match Update Time Venue
डेरेल मिचेलने इंग्लंड विरूद्ध तब्बल 73 वर्षानंतर केला 'हा' कारनामा

भारताचा तीनही प्रकारातील कर्णधार रोहित शर्मा आणि संघातील काही वरिष्ठ खेळाडू इंग्लंड विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्याची तयारी करत आहेत. त्यामुळे आयर्लंडमध्ये होणाऱ्या दोन टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारताने युवा संघ पाठवला आहे. या संघाचे नेतृत्व संघात पुनरागमन करणारा हार्दिक पांड्या करणार आहे. त्याने गुजरात टायटन्सला नुकत्याच झालेल्या आयपीएल हंगामाचे विजेतेपद मिळवून देत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे. दरम्यान, संघातील अनुभवी खेळाडू भुवनेश्वर कुमारकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

India vs Ireland When And Where To Watch Live Match Update Time Venue
सराव सामन्यात भरत पाठोपाठ पंतचेही दमदार अर्धशतक

केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत देखील या संघात नसणार आहेत. राहुल दुखापतीमुळे तर अय्यर आणि पंत इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात खेळणार असल्याने ते आयर्लंड दौऱ्यावरील संघात नाहीयेत. त्यांच्या जागी आयपीएल गाजवणाऱ्या राहुल त्रिपाठी, अर्शदीप सिंग, उमरान मलिक यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. हे भारताकडून पदार्पण करण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडमध्ये असल्याने या संघासोबत व्हीव्हीएस लक्ष्मण आणि निवडसमिती अध्यक्ष चेतन शर्मा असणार आहेत.

India vs Ireland When And Where To Watch Live Match Update Time Venue
VIDEO : पुजाराचा शुन्यावर त्रिफळा उडवत शमीचे 'हटके' सेलिब्रेशन

सामना कोठे आणि कधी पहाल?

  • 26 आणि 28 जून, रविवार आणि मंगळवार, द व्हिलेज डब्ललिन

वेळ

  • भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता.

लाईव्ह सामना कोठे पहाल?

  • भारतात टी.व्ही. प्रक्षेपण : सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी

  • ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग : सोनी लिव्ह

  • याचबरोबर सामन्याचे लाईव्ह अपडेट esakal.com या वेबसाईटवर देखील पहावयास मिळतील.

भारताचा संघ

हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी विश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

आयर्लंडचा संघ

अँड्र्यू बॅलबिरने (कर्णधार), हॅरी टॅक्टर, जॉर्ज डॉकरेल, ग्रेथ डेलने, पॉल स्टिर्लिंग, कर्टिस कॅम्पहर, स्टिफन डोहने, लॉरकेन टकेर, मार्क अडैर, कॉनोर ऑफर्ट, जोशुआ लिटिल, अँडी मॅकब्रिन, बॅरी मॅकार्थ, क्रेग यंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.