Hockey : भारताची आज जपानशी लढत; हिशेब चुकता करण्याची संधी

साखळी फेरीत जपानविरुद्ध झालेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याची भारताकडे संधी
Asian Champions Trophy Hockey
Asian Champions Trophy Hockey
Updated on

Hockey Asia Cup 2022: भारतीय हॉकी संघाने साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीत इंडोनेशियाला १६-० अशा फरकाने धूळ चारत आशिया हॉकी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता भारताचा पुढील फेरीचा सामना आज जपानशी होणार आहे. याप्रसंगी साखळी फेरीत जपानविरुद्ध झालेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी भारताकडे असणार आहे.

‘अ’ गटातून जपान व भारत या देशांनी, तर ‘ब’ गटातून मलेशिया व दक्षिण कोरिया या देशांनी सुपर फोर या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. २८ मे पासून या फेरीला सुरुवात होणार आहे. या फेरीअखेर गुणतालिकेतील अव्वल दोन संघ जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र ठरतील. उर्वरित दोन संघांमध्ये तिसऱ्या स्थानासाठी लढत रंगणार आहे.

जपानविरुद्धच्या साखळी फेरीच्या लढतीत भारतीय संघामध्ये शिस्तीचा अभाव दिसला. पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात भारतीय संघ अपयशी ठरत आहे. इंडोनेशियासारख्या दुबळ्या संघाविरुद्धही तेच पाहायला मिळाले. इंडोनेशियाविरुद्धच्या लढतीत भारताला २२ शॉर्ट कॉर्नर मिळाले, पण यामधील ९ कॉर्नरचेच गोलमध्ये रूपांतर करण्यात त्यांना यश मिळाले.

या खेळाडूंकडून अपेक्षा

दीपसन तिर्की याने इंडोनेशियाविरुद्धच्या लढतीत पाच गोल करीत आपला ठसा उमटवला. पवन राजभर व उत्तम सिंग यांनीही चमक दाखवली आहे. या तीन खेळाडूंकडून उद्याच्या लढतीत भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. तसेच जपानच्या आक्रमक फळीला रोखण्याचे काम बिरेंद्र लाक्राला करावे लागणार आहे. लाक्रा हा भारतीय संघातील अनुभवी हॉकीपटू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.