Davis Cup 2023 : मोरोक्कोविरुद्ध भारतीय संघाचे पारडे जड

डेव्हिस टेनिस करंडक : रोहन बोपण्णाच्या अखेरच्या लढतीवर लक्ष
india vs morocco davis cup 2023 rohan bopanna yuki bhambri sumit nagal mukund sasikumar
india vs morocco davis cup 2023 rohan bopanna yuki bhambri sumit nagal mukund sasikumarSakal
Updated on

लखनौ : डेव्हिस टेनिस करंडकाच्या जागतिक गट दोनमध्ये घसरण झालेल्या भारतीय टेनिस संघाला उद्यापासून लखनौ येथे सुरू होणाऱ्या लढतीत मोरोक्कोचा सामना करावयाचा आहे. भारतासमोर तुलनेने मोरोक्कोचे आव्हान कमकुवत आहे. तसेच या लढतीत तमाम टेनिसप्रेमींच्या नजरा रोहन बोपण्णावर असणार आहेत.

तो आपली अखेरची डेव्हिस करंडक लढत खेळणार आहे. डेव्हिस करंडक २०१९ पासून नव्या स्वरूपात खेळवला जात आहे. मात्र तिथपासून भारताची पहिल्यांदाच जागतिक गट दोनमध्ये घसरण झाली आहे. या वर्षी टेनिस विश्‍वात भारतासाठी चांगल्या घडामोडी घडल्या नाहीत.

भारताला डेव्हिस टेनिस करंडकातील लढतीत डेन्मार्ककडून ३-२ अशी हार पत्करावी लागली. युकी भांब्री याने एकेरी विभागातून माघार घेत दुहेरी विभागाकडे मोर्चा वळवला. रामकुमार रामनाथन याची क्रमवारीत ५५०च्या खाली घसरण झाली.

एवढेच नव्हे तर भारताने एटीपी २५० स्पर्धेचे यजमानपदही गमावले. या वर्षी भारतासाठी एकमेव चांगली बाब घडली. रोहन बोपण्णा याने अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅमच्या पुरुषांच्या दुहेरीत उपविजेतेपद पटकावले.

वयाच्या ४३ व्या वर्षी शानदार खेळ

रोहन बोपण्णाची मोरोक्कोविरुद्धची लढत ही अखेरची डेव्हिस करंडकाची लढत असणार आहे. अमेरिकन ओपन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीत उपविजेतेपद पटकावणारा भारताचा हा पठ्ठ्या ४३ व्या वर्षीही शानदार खेळ करीत आहे. याप्रसंगी तो म्हणाला, डेव्हिस करंडक म्हणजे जणू काही टेनिसचा विश्‍वकरंडकच.

लिएंडर पेस व महेश भूपतीच्या साथीने खेळायला मला नेहमीच मजा आली, पण सध्याच्या युगातील टेनिसपटूंसाठी डेव्हिस करंडक ही इतर स्पर्धांसारखीच आहे. युवा टेनिसपटू डेव्हिस करंडकात सर्वस्व पणाला लावताना दिसत नाहीत, अशी टीका रोहन बोपण्णाकडून करण्यात आली. दरम्यान, अखिल भारतीय टेनिस संघटनेकडून गुरुवारी अखेरची लढत खेळणाऱ्या रोहन बोपण्णाला गौरवण्यात आले.

एकेरीतील खेळाडूचा शोध

अखिल भारतीय टेनिस संघटना व न खेळणारा कर्णधार रोहित राजपाल यांच्याकडून भारतात एकेरी विभागात अव्वल दर्जाचे खेळाडू निर्माण होत नाहीत, याबाबत चिंतन करणे गरजेचे आहे अन्‌ याच कारणामुळे ग्रँडस्लॅम व डेव्हिस करंडक या दोन प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये भारताला अपयश येत आहे.

आगामी काळात एकेरी विभागात एकापेक्षा एक असे शानदार खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. मोरोक्कोविरुद्धच्या लढतीत सुमित नागल व शशीकुमार मुकुंद यांच्या खांद्यावर भारताची एकेरीतील मदार अवलंबून असणार आहे.

भारत-मोरोक्को लढतीचे वेळापत्रक

  • शनिवार- शशीकुमार मुकुंद-यासिन दलिमी, सुमित नागल-ॲडम माऊंडिर

  • रविवार- रोहन बोपण्णा/युकी भांब्री - इलियट बेनचित्री/यौनेस लाराऊसी, सुमित नागल-यासिन दलिमी, शशीकुमार मुकुंद-ॲडम माऊंडिर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.