IND vs NED Playing-11: रोहित शर्मा 'या' खेळाडूला देणार विश्रांती! जाणून घ्या प्लेइंग-11

रोहित शर्मा नेदरलँड्सविरुद्ध प्लेइंग इलेव्हन बदलणार!
india vs netherland playing xi
india vs netherland playing xisakal
Updated on

India vs Netherland Playing And Dream-11 : टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ गुरुवारी नेदरलँड्सविरुद्ध आपला दुसरा सामना खेळणार आहे. सिडनीतील ऐतिहासिक सिडनी क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. भारताची नजर स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयावर असेल. गेल्या सामन्यात त्याने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला होता. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग-11 मध्ये बदल करतो की नाही याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

india vs netherland playing xi
NZ vs AFG : एकही सामना न जिंकता अफगाणिस्तानने उघडले गुणांचे खाते

टी-20 फॉरमॅटमध्ये भारताचा पहिल्यांदाच नेदरलँडशी सामना होणार आहे. टीम इंडियाने 2003 आणि 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्सचा पराभव केला होता. भारतीय संघाने त्याच्याविरुद्ध सिडनीमध्ये विजय मिळवला तर उपांत्य फेरीतील त्याचा मार्ग सुकर होईल. भारताचे दोन सामन्यांत चार गुण होतील. दुसरीकडे नेदरलँडचा संघ सुपर-12 मध्ये पहिलाच सामना खेळणार आहे. नेदरलँडनी पहिल्या फेरीत यूएई आणि नामिबियाविरुद्ध विजय मिळवला होता. तीन सामन्यांत दोन विजय मिळवून सुपर-12 साठी नेदरलँड पात्र ठरला.

india vs netherland playing xi
ICC T20 Ranking : अखेर विराटची प्रतिक्षा संपली; सूर्यकुमारला मात्र बसला फटका

भारतीय संघातील स्टार खेळाडू युझवेंद्र चहल, हर्षल पटेल आणि ऋषभ पंत यांना गेल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पुढील सामन्यात हार्दिक पांड्याला विश्रांती दिली जाऊ शकते, त्याच्या जागी ऋषभ पंतला खेळण्याची संधी मिळू शकते. त्याचवेळी रविचंद्रन अश्विनच्या जागी युझवेंद्र चहलचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

संभाव्य Playing-11 :

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (ऋषभ पंत), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()