India Vs Netherlands Analysis T20 World Cup 2022 : टी-20 वर्ल्डकप 2022 मध्ये भारताने सुपर-12 च्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँडचा 56 धावांनी पराभव करत सलग दुसरा सामना जिंकला. याचबरोबर ग्रुप 2 मध्ये 4 गुणांसह अव्वल स्थान देखील पटकावले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 2 गडी गमावून 179 धावा केल्या. कोहलीने 62, रोहितने 53 आणि सूर्यकुमारने नाबाद 51 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 123 धावा करू शकला. नेदरलँड्सकडून टीम प्रिंगलने 20 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
रोहितला दोनदा जीवदान राहुल पुन्हा फेल :
भारताच्या डावातील पाचव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रोहित शर्माला जीवदान मिळाले. त्यावेळी रोहित 13 धावा करून खेळत होता. फ्रेड क्लासेनच्या चेंडूवर प्रिंगलने त्याला जीवदान दिले. यानंतर पुढच्या षटकात रोहितला पुन्हा जीवदान मिळाले. त्यावेळी तो 15 धावावर खेळत होता. दोन झेल सुटल्यानंतर रोहितने गियर बदलला आणि वेगाने धावा काढायला सुरुवात केली.
केएल राहुल पुन्हा फेल ठरला. 12 चेंडूत नऊ धावा करून तो एलबीडब्ल्यू बाद झाला. चेंडू विकेटच्या बाहेर जात असल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट होते. राहुलने रिव्ह्यू घेतला असता तर तो वाचला असता. त्याने तसे केले नाही. त्याची बॅट पाकिस्तानविरुद्धही शांत होती.
विराट कोहलीचा दबदबा, सूर्यकुमार पुन्हा मार्गावर परतला :
कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर आपला दबदबा कायम ठेवला आहे. मेलबर्ननंतर आता सिडनीतही त्याने अर्धशतक केले. विराट शेवटपर्यंत एक टोक धरले आणि वेगाने धावा करत राहिला. कोहलीने 44 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या. यादरम्यान विराटचे जबरदस्त शॉट्स पाहायला मिळाले. फॉर्मात असूनही पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरलेल्या अव्वल चार फलंदाजांपैकी सूर्यकुमार एक होता. ती उणीव सूर्यकुमारने सिडनीत भरून काढली असं वाटत आहे कारण त्याने विराटची साथ देत वेगाने धावा केल्या. या खेळीने सूर्यकुमारचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल हे मात्र नक्की.
भारताच्या विजयात गोलंदाजांनी भरला रंग :
भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांनी आज खरे चमकदार गोलंदाजी केली. भुवनेश्वर आपल्या जुन्या रंगात खेळताणा दिसला, तर मोहम्मद शमीने त्याला चांगली साथ दिली. भुवीने दोन ओव्हर मेडन्स टाकल्या ज्यात चार षटकात फक्त नऊ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. फिरकीमध्ये पाहिल तर अश्विन आणि अक्षर यांनी फलंदाजांना बांधून ठेवले होते. अश्विन, अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. अर्शदीपनेही दोन विकेट घेतल्या पण 37 धावा देत थोडा महाग ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.