India vs New Zealand 2st ODI Playing-XI : भारतीय क्रिकेट संघाला दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची मायदेशातील मालिका जिंकायची आहे. पहिल्या सामन्यात शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने 12 धावांनी विजय मिळवला होता.
न्यूझीलंड संघाने 350 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जबरदस्त लढाऊ क्षमता दाखवली. एका टप्प्यावर पाहुण्या संघाने 131 धावांत सहा विकेट गमावल्या होत्या पण त्यानंतर संघाला आणखी 206 धावा करता आल्या. गोलंदाज मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताला सामना जिंकण्यात यश आले.
दुसऱ्या सामन्यात रोहितसमोर आव्हान आहे की त्याने कोणत्या 11 खेळाडूंसोबत खेळायचे. या सामन्यात राहुल द्रविड आणि रोहित मोठे बदल करू शकतात. पहिल्या सामन्यात फलंदाजी मजबूत करण्यासाठी शार्दुल ठाकूरची प्लेईंग-11 मध्ये निवड करण्यात आली होती पण तो चांगलाच महागात पडला. शार्दुलने 7.2 षटकात 54 धावा देत दोन बळी घेतले.
रोहित त्याच्या जागी तुफानी वेगवान गोलंदाज उमरान मलिकला संधी देऊ शकतो. उमरानचा वेग फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. हे त्यांनी अनेकदा सिद्ध केले आहे. अलीकडेच उमरानने श्रीलंका मालिकेत आपला वेग दाखवला. अशा परिस्थितीत शार्दुलऐवजी उमरानला प्लेइंग-11 मध्ये संधी मिळू शकते. टीम इंडियामध्ये अन्य कोणताही बदल होण्याची शक्यता दिसत नाही.
मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडची लढाऊ क्षमता दिसून आली. ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर यांनी खालच्या फळीत संघासाठी चांगले पुनरागमन केले. फिन ऍलनने काही शानदार फटके खेळले. अनुभवी केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडच्या एका फलंदाजाला एक टोक धरावे लागणार आहे. हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन आणि ब्लेअर टिकनर या वेगवान त्रिकूटाला अधिक लय हवी आहे. पहिल्या सामन्यात शुभमनने त्याच्या चेंडूवर चांगलेच फटकेबाजी केली. सोधी या सामन्यासाठी फिट होतो की नाही हेही पाहावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.