IND vs NZ 1st ODI: भारत-न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामन्यात होणार का रद्द ?

टी-20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाची नजर आता एकदिवसीय मालिकेवर...
India vs New Zealand 1st ODI
India vs New Zealand 1st ODI sakal
Updated on

India vs New Zealand 1st ODI : न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-0 ने जिंकल्यानंतर टीम इंडियाची नजर आता एकदिवसीय मालिकेत किवीजचा पराभव करण्यावर आहे. जर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकली तर तो आयसीसी क्रमवारीत नंबर 1 वनडे संघ बनेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना उद्या म्हणजेच शुक्रवारी भारतीय वेळेनुसार सकाळी ७.०० वाजता खेळल्या जाणार आहे.

India vs New Zealand 1st ODI
Jofra Archer : MI ची स्पीडगन अखेर अवतरली मैदानात, IPL 2023 मध्ये मुंबईची ताकद वाढली!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे दरम्यान उद्या ऑकलंडमध्ये हवामान कसे असेल याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. टी-20 मालिकेत पावसामुळे दोन सामन्यांची मजा काहीशी खराब झाली. उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान ऑकलंडमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. ऑकलंडमधील इतर दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी सामन्याच्या दिवशी हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात पावसामुळे व्यत्यय येणार नाही. ऑकलंडमध्ये संध्याकाळी तापमान 16 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे आणि वाऱ्याचा वेग ताशी 16 किमी असेल.

India vs New Zealand 1st ODI
FIFA World Cup 2022 : अर्जेंटिनानंतर आता जर्मनीचाही पराभव

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडू खेळत नाहीत. वनडे मालिकेत टीम इंडियाचे कर्णधारपद शिखर धवनकडे आहे. शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन आणि शाहबाज अहमद हे युवा खेळाडू वनडे मालिकेत आपली ताकद दाखवतील. टीम इंडियाने न्यूझीलंडच्या भूमीवर एकदिवसीय मालिका जिंकली तर ती त्यांच्यासाठी मोठी उपलब्धी असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()