IND vs NZ 1st Test Day 4 : अजिंक्य-पुजाराचं करायचं काय?

पहिल्या डावातही ही दोघ सपशेल अपयशी ठरली होती.
Ind vs NZ
Ind vs NZSakal
Updated on
Summary

पहिल्या डावातही ही दोघ सपशेल अपयशी ठरली होती.

IND vs NZ 1st Test Day 4 : कानपूर कसोटीच्या दुसऱ्या डावात कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा फेल ठरले. भारतीय संघाने 1 बाद 14 धावांवरुन चौथ्या दिवसाच्या डावाला सुरुवात केली. चेतेश्वर पुजाराच्या रुपात टीम इंडियाला जेमीसनने दुसरा धक्का दिला. त्याने 33 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 22 धावा केल्या. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या अजिंक्य रहाणेला अजाझ पटेलनं तंबूत धाडले. अजिंक्यने अवघ्या 4 धावांची भर घातली.

अजिंक्य रहाणेची कामगिरी गेल्या काही वर्षांपासून खालावली आहे. यात सुधारणा होण्याची कोणतीच चिन्ह दिसत नाहीत. मागील 50 कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेनं 32.73 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. 2016 मध्ये इंदौरच्या मैदानात अजिंक्य रहाणेनं 188 धावांची खेळी केली होती. त्यानंतर सातत्याने तो फेल ठरताना दिसते. न्यूझीलंड विरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेनं चांगली सुरुवात केली होती. पण 35 धावांवर तो बाद झाला होता. पहिल्या डावातही त्याला जेमीसननेच बाद केले. दुसरीकडे चेतेश्वर पुजाराला साउदीने 26 धावांवर बाद केले होते.

न्यूझीलंड संघाचा पहिला डाव 296 धावांत आटोपून टीम इंडियाने पहिल्या डावात 49 धावांची आघाडी घेतली होती. अल्प आघाडीसह न्यूझीलंडसमोर टार्गेट देताना भारतीय फलंदाजी कोलमडली आहे. सध्याच्या घडीला 100 + धावांची आघाडी असली तरी आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यामुळे सामना न्यूझीलंडच्या बाजूनं झुकल्याचे दिसते. फलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीमुळे भारतीय गोलंदाजांसमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.