India VS New Zealand 3rd T20 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने गुजरातीमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडची अवस्था लिंबूटिंबू टीमसारखी केली. भारतीय वेगवान गोलंदाजांच्या वादळात सापडलेल्या किवींची फलंदाजी पोलापोचोळ्यासारखी उडून गेली. भारताच्या 235 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांचा संपूर्ण संघ धावात पॅव्हेलियनमध्ये पोहचला. भारताने तिसरा टी 20 सामना विक्रमी 168 धावांनी जिंकत मालिका विजयाची घोडदौड कायम राखली. भारताकडून फलंदाजीत शुभमन गिलने 63 चेंडूत नाबाद 126 धावांची खेळी केली. तर गोलंदाजीत हार्दिक पांड्याने 16 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, भारताने न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात 20 षटकात 4 बाद 234 धावा केल्या. भारताकडून शुभमन गिलने नाबाद 126 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपले पहिले वहिले टी 20 आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. गिलने पूर्ण 20 षटके खेळली. त्याला राहुल त्रिपाठीने 44 तर हार्दिक पांड्याने 17 चेंडूत 30 धावा करून चांगली साथ दिली. गिलने भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला. त्याने 63 चेंडूत नाबाद 126 धावा केल्या.
हार्दिक पांड्याने आपल्या 4 षटकात 16 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.
शिवम मावीने 9 व्या षटकात पाठोपाठ दोन शिकार केल्या. त्याने सँटनरला 13 तर इश सोधीला शुन्यावर बाद करत अवस्था 7 बाद 53 धावा अशी केली.
भारताने पॉवर प्लेमध्येच किवींची अवस्था 5 बाद 21 धावा अशी केली. हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी 2 तर उमरान मलिकने एक विकेट घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
भारताचे भीमकाय 235 धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या किंवींना पहिल्या दोन षटकात दोन धक्के मिळाले. हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात फिन एलनला 3 तर दुसऱ्या षटकात अर्शदीप सिंगने डेवॉन कॉन्वेला अवघ्या 1 धावेवर बाद केले.
शुभमन गिलने अवघ्या 54 चेंडूत शतकी मजल मारत भारताला 200 च्या पार पोहचवले. गिलने आपल्या 7 व्या टी 20 सामन्यात अर्धशतकी नाही तर थेट शतकी खेळी केली.
वनडे क्रिकेटमध्ये नुकताच द्विशतकी धमाका करणाऱ्या गिलच्या टी 20 कारकिर्दिची सुरूवात खास झाली नव्हती. मात्र न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात गिलने तडाखेबाज खेळी करत भारताला 16 षटकात 170 धावांपर्यंत मजल मारून दिली.
शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी रचली. मात्र ही भागीदारी टिकनेरने तोडली. त्याने 13 चेंडूत 24 धावा करणाऱ्या सूर्यकुमारला बाद केले.
शुभमन गिलने 35 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत भारताला 12 षटकार 2 बाद 118 धावांपर्यंत पोहचवले. हे गिलचे टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक आहे.
इशान किशन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या ऐवजी राहुल त्रिपाठीला पॉवर प्लेचा फायदा उचलण्यासाठी बढती देऊन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. बढती मिळालेल्या त्रिपाठीने पॉवर प्लेच्या उत्तरार्धात आपला गिअर बदलला. त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारत 22 चेंडूत 44 धावा चोपल्या. त्याने भारताला 8 षटकात जवळपास 80 धावांपर्यंत पोहचवले होते.
त्याने अर्धशतकाच्या रेसमध्ये गिलला देखील मागे टाकले. मात्र तो षटकार मारण्याच्या नादात बाद झाला आणि त्याचे अर्धशतक अवघ्या 6 धावांनी हुकले.
सलामीवीर शुभमन गिलने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करत भारताला अर्धशतकी मजल मारून दिली.
भारताचा सलामीवीर इशान किशन दुसऱ्याच षटकात अवघी 1 धाव करून बाद झाला.
हार्दिक पांड्याने तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी आपल्या संघात एकच बदल केला आहे. हा बदल फलंदाजीत झाला नसून गोलंदाजीत झाला आहे. त्याने युझवेंद्र चहलच्या ऐवजी उमरान मलिकला संघात स्थान दिले आहे. सलामीवीर पृथ्वी शॉला तिसऱ्या सामन्यात देखील बेंचवरच बसावे लागणार आहे.
हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेत शुभमन गिल आणि इशान किशन हे दोन्ही सलामीवीर फारशी चांगली कामगिरी करू शकलेले नाहीत. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या इन फॉर्म पृथ्वी शॉला तिसऱ्या टी 20 सामन्यात संधी देण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.