मुंबई : मुंबई : वानखेडे कसोटीत आज चौथ्या दिवशी न्यूझीलंडचे उरलेला पाच फलंदाज झटपट बाद करुन भारत २ सामन्यांची कसोटी मालिका १ - ० ने जिंकली. भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर 540 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने न्यूझीलंडचा दुसरा डाव १६७ धावात गुंडाळत सामना 372 धावांनी जिंकत मालिका खिशात घातली . भारताकडून दोन्ही ऑफ स्पिनर जयंत यादव आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी ४-४ विकेट घेतल्या. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने सर्वाधिक ६० धावा केल्या.
भारताने न्यूझीलंडचा दुसरा डाव १६७ धावात गुंडाळला. भारताकडून दोन्ही ऑफ स्पिनर जयंत यादव आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी ४ विकेट घेतल्या. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने सर्वाधिक ६० धावा केल्या.
भारताने नाफेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामावीर मयांक अग्रवालच्या दमदार १५० धावांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३२५ धावा उभारल्या. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने विश्वविक्रमी गोलंदाजी करत भारताचा संपूर्ण संघ एकट्यानेच बाद केला. एका डावात १० विकेट घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला.
त्यानंतर भारताने न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावातच गुंडाळात सामन्यावर मजबूत पकड मिळवली. मात्र भारताने न्यूझीलंडला फॉलोऑन न देता फलंदाजी करत दुसऱ्या डावात ७ बाद २७६ धावा उभारल्या. त्यामुळे न्यूझीलंडसमोर विजयासाठी ५३९ धावांचे महाकाय आव्हान उभे राहिले. तिसऱ्या दिवशी हे या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडचा निम्मा संघ १४० धावात पॅव्हेलियनमध्ये परतला.
अश्विनने हेन्री निकोल्सला ४४ धावांवर बाद करत मालिका विजयावर केले शिक्कामोर्तब
हेन्री निकोल्स अर्धशतकाजवळ, मात्र भारतीय गोलंदाज ते पूर्ण करु देणार का?
न्यूझीलंडचे खालची फळी ढेपाळली, जयंतने साऊदलाही खोते उघडू दिले नाही.
53.2 : कायल जेमिसन भोपळाही न फोडता माघारी, जयंतने न्यूझीलंडला दिला तिसरा धक्का
न्यूझीलंडाच्या ७ बाद १६५ धावा
51.5 : जयंत यादवचा न्यूझीलंडला धक्का, रचिन रविंद्र १८ धावा करुन बाद
जयंत यादवने केली चौथ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात
न्यूझीलंडला विजयासाठी अजून ४०० धावांची गरज तर भारताला ५ विकेट्सची.
हेन्री निकोल्स ३६ धावांवर तर रचिन रविंद्र २ धावांवर खेळत आहेत.
न्यूझीलंड चौथ्या दिवसाची सुरुवात ५ बाद १४० धावांपासून करणार सुरू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.