IND vs NZ Weather Update : धरमशालामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, भारत अन् न्यूझीलंडचा सामना रद्द झाल्यास तर काय?

India vs New Zealand Dharamsala Weather Update
India vs New Zealand Dharamsala Weather Update
Updated on

India vs New Zealand Dharamsala Weather Update : आज भारतीय संघ वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये पाचवा सामना खेळणार आहे. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल.

या दोन्ही संघांनी या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. पण चाहत्यांसाठी एक वाईट बातमीही येत आहे. वास्तविक, धरमशाला येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पूर्ण होण्याची फारच कमी आशा आहे किंवा हा सामना कमी षटकांचा असू शकतो. याला कारण म्हणजे पाऊस.

India vs New Zealand Dharamsala Weather Update
IND vs NZ : सामन्यापूर्वी भारताला दुहेरी धक्का, सरावादरम्यान सूर्या जखमी, तर इशान किशनला चावल्या मधमाशा

Accuweather नुसार, रविवारी धरमशाला येथील कमाल तापमान 18 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे. या दिवशी पावसाची शक्यता 42 टक्के आहे. आकाश ढगाळ असेल आणि वाऱ्याचा वेग 26 किमी/ताशी असेल.

चाहत्यांसाठी वाईट बातमी म्हणजे हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होणार असून यादरम्यान पावसाची शक्यता सर्वाधिक आहे. धरमशाला मध्ये दुपारी 2 वाजता पावसाची शक्यता 51 टक्के आणि दुपारी 3 वाजता 47 टक्के आहे.

मात्र, चांगली गोष्ट म्हणजे 3 वाजल्यानंतर पावसाची शक्यता खूपच कमी होईल. 4 ते 6 या वेळेत पावसाची शक्यता 14 टक्के असेल. यानंतर ते 2 टक्क्यांपर्यंत राहील. सामना उशिरा सुरू होऊ शकतो.

India vs New Zealand Dharamsala Weather Update
IND vs NZ : 'संघात समतोल बिघडला पण...' उपकर्णधार पांड्याच्या जागी कोण खेळणार? कोच राहुल द्रविड स्पष्टच बोलले

भारत आणि न्यूझीलंडचा सामना झाला नाही तर काय?

वर्ल्ड कप 2023 साठी आयसीसीच्या नियमांनुसार, लीग सामन्यांसाठी 'राखीव दिवस' ठेवला नाही. आजचा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पावसामुळे वाहून गेला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. आतापर्यंतच्या वर्ल्ड कपच्या एकाही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला नाही ही चांगली गोष्ट आहे.

मात्र, 17 ऑक्टोबरला धरमशाला येथे झालेल्या नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात पावसामुळे 43 षटकांचा खेळ झाला. त्याच वेळी, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम येथे भारताचे वर्ल्ड कप 2023 चे दोन्ही सराव सामने पावसामुळे रद्द करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()