IND vs NZ : न्यूझीलंडविरूद्धच्या पराभवानंतर भारत World Cup Super League यादीत कोणत्या स्थानावर आहे?

India vs New Zealand World Cup Super League
India vs New Zealand World Cup Super Leagueesakal
Updated on

India vs New Zealand World Cup Super League : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने गमावला. न्यूझीलंडने भारताचे 307 धावांचे आव्हान 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले होते. या पराभवाचा भारताच्या वर्ल्डकप सुपर लीग रँकिंगवर काय परिणाम झाला आहे का? याचे उत्तर आहे नाही. न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा 7 विकेट्सनी पराभव झाला असला तरी त्याच्या WCSL रँकिंगवर कोणताही परिणाम झालेला नाही. भारताचे अव्वल स्थान अजूनही अबाधित आहे. दुसरीकडे भारताचा पराभव केल्यानंतर न्यूझीलंडने आपल्या रँकिंमध्ये दोन स्थानांची सुधारणा करत चौथे स्थान पटकावले आहे.

India vs New Zealand World Cup Super League
Team India : वर्ल्ड कप पराभवानंतर BCCI एक्शन मोड! 'या' दिग्गज खेळाडूला केलं बाहेर

वर्ल्डकप सुपर लीग यादीत भारताचे 19 सामन्यात 129 गुण झाले आहेत. तो सध्या यादीत अव्वल स्थानावर आहे. यानंतर 18 सामन्यात 125 गुण घेऊन इंग्लंड दुसऱ्या तर 18 सामन्यात 120 अंकानिशी ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. याचबरोबर न्यूझीलंड 16 सामन्यात 120, बांगलादेशचे 18 सामन्यात 120 गुण झाले आहेत.

ऑकलंडमध्ये झालेल्या भारत विरूद्ध न्यूझीलंड पहिल्या वनडे सामन्यात टॉम लॅथम आणि केन विलियम्सन यांना चौथ्या विकेटसाठी दमदार 221 धावांची नाबाद भागीदारी रचली होती. लॅथमने नाबाद 145 तर केन विलियम्सनने नाबाद 94 धावा केल्या. न्यूझीलंडने या दमदार विजयानंतर वर्ल्डकप सुपर लीग यादीत मोठी झेप घेतली. या विजयामुळे न्यूझीलंडला वर्ल्डकप सुपर लीगचे 10 गुण मिळाले.

India vs New Zealand World Cup Super League
IND vs NZ 2nd ODI : अशी असेल भारताची Playing 11, उपकर्णधारालाच बेंचवर बसवणार?

प्रत्येक संघाला प्रत्येक विजयानंतर 10 गुण मिळतात. जर सामना टाय झाला किंवा कोणताही निकाल लागला नाही तर किंवा सामना रद्द झाल्यानंतर 5 गुण मिळतात. जर संघ हरला तर कोणतेही गुण मिळत नाहीत. वर्ल्डकप सुपर लीगमधील पहिल्या आठ संघांना भारतात 2023 मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे.

उरलेल्या संघांना पाच असोसिएट संघांसोबत आयसीसी वर्ल्डकप पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. या पात्रता फेरीतून दोन संघ वर्ल्डकपमध्ये दाखल होतील. वर्ल्डकपचे यजमानपद भारताकडे असल्याने भारत वर्ल्डकपसाठी थेट पात्र झाला आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()