Suryakumar Yadav : 'गोल्डन डक'चा काळा डाग तरी वर्ल्ड कपमध्ये संधी; सूर्या पुसणार का जुना इतिहास?

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav
Updated on

Suryakumar Yadav World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि न्यूझीलंड संघ आज धरमशाला येथे आमनेसामने आहेत. विजय किंवा पराभवाच्या निकालाव्यतिरिक्त हा सामना देखील महत्वाचा आहे. कारण जो जिंकले तो पॉइंट टेबल मध्ये पहिल्या स्थानाल जाईल. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक संपल्यानंतर दोन्ही संघांनी आपापल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणाही केली.

Suryakumar Yadav
IND vs NZ Playing 11 : कर्णधार रोहितने भारतीय संघात मोठा बदल! शार्दुल ठाकूर बाहेर, 'या' दोन खेळाडूंना दिली संधी

बांगलादेशविरुद्धच्या चौथ्या सामन्यात स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या दुखापतीचा बळी ठरला. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने टी-20 किंग सूर्यकुमार यादववर मोठा डाव खेळला आहे. या वर्षात सूर्याला खूप संधी मिळाल्या, पण तो काही विशेष करू शकला नाही. तरी पण त्याला वर्ल्ड कपमध्ये संधी दिली आहे.

Suryakumar Yadav
World Cup 2023 : इंग्लंडसाठी दुष्काळात तेरावा! दिग्गज वेगवान गोलंदाज वर्ल्ड कपमधून होणार बाहेर?

सूर्यकुमार यादव या वर्षी जवळपास 14 एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळला गेला. खराब आकडेवारीमुळे त्याची संघात निवड झाल्यानंतर त्याला आणि संघाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले.

कारण वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तो सलग 3 सामन्यात शून्यावर बाद झाला होता. यानंतरही रोहितने त्याच्यावर विश्वास ठेवला, पण अपेक्षेप्रमाणे तो खेळू शकला नाही. मात्र, वर्ल्ड कपपूर्वी सुर्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगला खेळला, त्यामुळे त्याला मेगा स्पर्धेत सुवर्ण संधी मिळाली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने दोन अर्धशतकांची खेळी खेळली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सुर्याने 52 धावा केल्या होत्या तर शेवटच्या सामन्यात त्याने 72 धावा केल्या होत्या. आता वर्ल्ड कप पदार्पणात सुर्या मोठी खेळी खेळण्यात यशस्वी ठरतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भारताची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()