Ind vs Nz : शार्दुल ठाकूर बाहेर, शमी-अश्विनची एन्ट्री निश्चित? न्यूझीलंडविरुद्ध 'ही' आहे भारताची Playing 11

India vs New Zealand World Cup 2023 Playing 11
India vs New Zealand World Cup 2023 Playing 11sakal
Updated on

India vs New Zealand World Cup 2023 Playing 11 : भारतीय संघ वर्ल्ड कप 2023 मध्ये विजयाच्या रथावर स्वार आहे. टीम इंडियाने सलग चार सामने जिंकले आहेत. आता टीम इंडियाचा सामना रविवारी (22 ऑक्टोबर) न्यूझीलंडशी होणार आहे. टीम इंडियाला या सामन्याआधी मोठा धक्का बसला. दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या हार्दिक पांड्या या सामन्यात खेळणार नाही.

मात्र, भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोटेशन करण्यास नकार दिला होता. अशा स्थितीत चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आला आहे की धर्मशालामध्ये न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचे प्लेइंग कॉम्बिनेशन काय असू शकते?

India vs New Zealand World Cup 2023 Playing 11
NED vs SL : नेदरलँड्‌स श्रीलंकेलाही धक्का देणार? लखनौमध्ये आज दोन्ही संघ आमने-सामने

आकडेवारी आणि कामगिरीचा विचार केला तर किवी संघाविरुद्ध टीम इंडियाच्या युनिटमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. हार्दिक पांड्या दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागी कोण येणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पांड्या आता थेट लखनऊमध्ये संघात सामील होईल जिथे भारत 29 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध खेळेल.

हार्दिकची जागा घेणार रविचंद्रन अश्विन?

सध्या टीम इंडियामध्ये हार्दिक पांड्याऐवजी आर अश्विन हा पर्याय असेल. अश्विन 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात खेळण्यासाठी आला होता. जिथे त्याने एक विकेट घेतली.

त्या सामन्यात अश्विनने दहा षटकात 34 धावा देत एक विकेट घेतली होती. अश्विनही खालच्या क्रमाने फलंदाजी करू शकतो. अशा स्थितीत तो हार्दिकची जागा भरून काढू शकतो. या वर्ल्ड कप मध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी सरासरीची आहे. त्याने गोलंदाजीत एकूण 5 विकेट घेतल्या आहेत. त्याच वेळी, त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ एका सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली, जिथे त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 11 नाबाद धावा केल्या.

India vs New Zealand World Cup 2023 Playing 11
Team India : ड्रेसिंग रूममधील नवे मानसशास्त्र परिणामकारक! भारतीय संघ व्यवस्थापनाच्या प्रयोगामुळे हलके-फुलके वातावरण

शार्दुल होणार बाहेर, शमीला संधी मिळणार?

या वर्ल्ड कपमध्ये शार्दुल ठाकूरला ज्या प्रकारे संधी मिळत आहेत. त्यानंतर आता सोशल मीडियावर चाहतेही संतापलेले दिसत आहेत. कारण शार्दुलने आजून पण चांगली कामगिरी केलेली नाही. 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरुद्ध अश्विनच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी मिळाली, त्यानंतर सुनील गावसकरपासून इरफान पठाणपर्यंत सर्वांनीच त्याच्या समावेशावर प्रश्न उपस्थित केले.

वर्ल्ड कपमध्ये शार्दुल ठाकूरची कामगिरी

अफगाणिस्तान विरुद्ध: 6-0-31-1

पाकिस्तान विरुद्ध: 2-0-12-0

बांगलादेश विरुद्ध: 9-0-59- 1

मोहम्मद शमी विरुद्ध शार्दुल ठाकूर

आता शार्दुल ठाकूरची तीन सामन्यांतील आकडेवारी पाहिली तर धर्मशाळेत त्याला संधी द्यायला हवी असे काहीही त्याने केलेले नाही हे स्पष्ट होत आहे. यापेक्षा मोहम्मद शमी हा चांगला पर्याय असू शकतो. शमीने एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये (2015 आणि 2019) मध्ये एकूण 11 सामने खेळले आहेत, जिथे त्याने 11 सामन्यांमध्ये 31 विकेट घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत त्याच्याकडे सतत दुर्लक्ष केल्याने चाहते सोशल मीडियावर चांगलेच संतापले आहेत.

न्यूझीलंडविरुद्ध 'ही' असू शकते भारताची Playing 11

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर/मोहम्मद शमी, कुलदीप यादव, मोहम्मद बुमराह, जसप्रीत बुमराह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.