Asia Cup 2022: भारत पाकिस्तान मॅच कधी? जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंग, प्लेइंग 11 आणि खूप काही...

भारत आणि पाकिस्तान सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत...
 india vs pakistan
india vs pakistan sakal
Updated on

India vs Pakistan Asia Cup 2022 : आशिया कप टी-20 स्पर्धेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. T20 स्पर्धेचे मुख्य सामने 27 ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सुरू होत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना (IND vs PAK) 28 ऑगस्ट रोजी दुबईमध्ये होणार आहे. दोन्ही देशांचे क्रीडाप्रेमी या सामन्याची वाट पाहत आहेत.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2021 च्या T20 विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन्ही देशांमधील टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांबाबत बोलायचे झाले तर टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला आहे. दोघांमध्ये आतापर्यंत नऊ टी-20 सामने खेळले गेले आहेत. भारताने 7 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे पाकिस्तान संघ 2 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.

 india vs pakistan
Asia Cup 2022 : उपकर्णधार केएल राहुलवर आशिया कप 2022 पूर्वी टांगती तलवार

आशिया कपमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्डही चांगला आहे. भारताने आतापर्यंत 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा संघ केवळ 2 वेळा चॅम्पियन बनला आहे. आशिया चषक दुसऱ्यांदा T20 फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. 2016 मध्ये जेव्हा टीम इंडिया चॅम्पियन बनली तेव्हा पहिल्यांदाच याचे आयोजन करण्यात आले होते.

 india vs pakistan
Asia Cup 2022 : पाकिस्तानविरूद्ध अशी असेल भारताची प्लेईंग इलेव्हन
  • भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2022 सामना कधी होणार?

    आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्ट (रविवार) रोजी सामना होणार आहे.

  • आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोठे आणि कधी खेळला जाईल?

    आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळला जाईल.

  • भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2022 सामन्याचे थेट प्रक्षेपण, लाइव्ह स्ट्रीमिंग कोठे पाहायचे?

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2022 सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर. सामन्याच्या लाइव्ह अपडेटसाठी सकाळ वेबसाइटला फॉलो करा.

 india vs pakistan
Asia Cup 2022 : भारत मुंबईतून तर पाकिस्तान अ‍ॅमस्टरडॅममधून दुबईसाठी रवाना

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.


पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.