Asia Cup 2022: प्रशिक्षक Rahul Dravid संघात येताच 'या' खेळाडूच्या कारकिर्दीला ब्रेक!

राहुल द्रविड परतताच पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमधून एका स्टार खेळाडूला वगळण्यात आले.
Rahul Dravid
Rahul Dravidesakal
Updated on

India vs Pakistan Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. टीम इंडियाकडून अनेक खेळाडूंनी चांगली खेळी दाखवली. आशिया चषकापूर्वी टीम इंडिया झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर होती, जिथे टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण होते, मात्र आशिया कपसाठी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड परतले आहेत. राहुल द्रविड परतताच पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमधून एका स्टार खेळाडूला वगळण्यात आले. तर हा खेळाडू टीम इंडियासाठी लकी चार्म ठरला आहे.

Rahul Dravid
Video : धोनी स्टाईलमध्ये सामना संपल्यानंतर हार्दिक म्हणाला, माही भाईकडून...

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दीपक हुड्डाला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आला नव्हता. दीपक हुड्डा चौथ्या क्रमांकावर खेळण्याचा मोठा दावेदार होता. अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलण्याची क्षमता त्याच्यात आहे. भारतीय संघासाठी त्याने अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी आता टीम इंडियात आपली जागा पक्की केली आहे. अशा परिस्थितीत दीपक हुड्डाच्या कारकिर्दीवर ब्रेक लागलेला दिसत आहे.

Rahul Dravid
Urvashi-Pant: पंतच्या फॅन्सनी उर्वशीची जुनी पोस्ट केली व्हायरल, म्हणाली होती...

दीपक हुड्डाने आयर्लंड दौऱ्यावर झंझावाती शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दीपक हुड्डाने भारतीय संघासाठी आतापर्यंत 17 टी-20 सामने खेळले असून संघाने हे सर्व जिंकले आहेत. तो टीम इंडियाचा लकी चार्म म्हणून उदयास आला आहे. दीपक हुड्डा आयपीएल 2022 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळला. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच त्याला टीम इंडियात संधी मिळाली, पण आता तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे. दीपक हुडाने भारतीय संघासाठी 8 एकदिवसीय सामन्यांमध्ये 141 धावा केल्या आहेत आणि तीन विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 9 टी-20 सामन्यांमध्ये 274 धावा केल्या आहेत, ज्यात एका झंझावाती शतकाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.