Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामना राहिला अपूर्ण; 'रिझर्व्ह डे'ला कसा खेळवला जाईल, जाणून घ्या

cricket match
cricket match
Updated on

India vs Pakistan, Asia Cup 2023

कोलंबो- भारत पाकिस्तानमधील सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. त्यामुळे हा सामना रिझर्व्ह डे साठी गेला असून तो सोमवारी खेळला जाईल. भारताने प्रथम बॅटिंग करताना चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल लागोपाठ आऊट झाले. भारताने १४७ धावा २ विकेट असा स्कोअर केला होता. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रिझर्व्ह डेला गेला आहे. त्यामुळे उद्या हा सामना कसा खेळवला जाईल याबाबत माहिती घेऊया...

सामना कधी खेळला जाईल?

पावसामुळे व्यत्यय आला तर भारत-पाकिस्तान सामना रिझर्व्ह ठेवला जाणार होता. त्यामुळे आता ११ सप्टेंबरला हा सामना होईल.

सामना कधी सुरु होईल?

सामना भारतीय वेळेनुसार तीन वाजता सुरु होईल

सामना कुठे खेळला जाईल?

कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाईल

सामन्याचे स्वरुप काय असेल?

सोमवारचा सामना ५० ओव्हरचा असेल. याचा अर्थ भारत २४.१ ओव्हरपासून पुढे खेळायला सुरुवात करेल आणि पूर्ण ५० ओव्हर खेळेल. त्यानंतर पाकिस्तान बॅटिंग करेल.

cricket match
स्टेडीयम ओसाड! भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, पाकिस्तानी दिग्गजाने व्यक्त केली चिंता

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून भारतीय संघाला प्रथम खेळण्याचे निमंत्रण दिले. कर्णधार रोहित शर्मा आणि युवा सलामीवीर शुभमन गिल यांनी भारताला आक्रमक सुरुवात करून दिली.

दोघांनी 100 चेंडूत 121 धावांची भागीदारी केली. केएल राहुल आणि विराट कोहली क्रिजवर खेळत होते. पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा भारतीय डावात केवळ 24.1 ओव्हर झाली होती. यावेळी भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 147 धावा होती. सोमवारी केएल राहुल आणि कोहली सामना सुरु करतील.

cricket match
Ind vs Pak : आज भारत-पाकिस्तान सामना पूर्ण झाला नाही, तर काय असतील 'रिझर्व्ह डे'चे नियम?

भारत पाकिस्तान स्कोअर कार्ड

भारत: 142/2 (24.1 ओव्हर)

विराट कोहली -8* (16)

केएल राहुल -17* (28)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.