Asia Cup 2023 : भारत - पाकिस्तान आशिया कप विजेतेपदासाठी भिडणार, जाणून घ्या कधी अन् कुठं पाहायचा सामना!

India Vs Pakistan ACC Emerging Asia Cup 2023
India Vs Pakistan ACC Emerging Asia Cup 2023 esakal
Updated on

India Vs Pakistan ACC Emerging Asia Cup 2023 : श्रीलंकेत सुरू असलेल्या इमर्जिंग टीम आशिया कपमध्ये आज सेमी फायलनमध्ये भारत अ संघाने बांगलादेश अ संघाचा 51 धावांनी पराभव केला. भारत आता अंतिम फेरीत पोहचला असून त्याचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे.

पाकिस्तानने पहिल्या सेमी फायनल सामन्यात श्रीलंका अ संघाचा पाकिस्तान अ संघाने 60 धावांनी पराभव केला. (Yash Dhull)

India Vs Pakistan ACC Emerging Asia Cup 2023
Virat Kohli Record : यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं! विराट कोहलीने 5 वर्षाचा दुष्काळ संपवत 500 वी कसोटी केली ऐतिहासिक

दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 211 धावांवर संपुष्टात आला होता. भारताचा कर्णधार यश धूलने झुंजार 66 धावांची खेळी करत भारताला 200 धावांचा टप्पा पार करून दिला होता. बांगलादेशकडून मेहदी हसन, तंझीम हसन शाकिब आणि राकिबूल हसनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

भारताचे विजयासाठीचे 212 धावांचे आव्हान घेऊन मैदनात उतरलेल्या बांगलादेशने 12 षटकात नाबाद 70 धावा ठोकत टेन्शन वाढवले होते. सलामीवीर तंझीद हसनने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर त्याला साथ देणाऱ्या मोहम्मद नैमने 38 धावा केल्या.

India Vs Pakistan ACC Emerging Asia Cup 2023
Para Archery Championship 2023 : शितल देवीने इतिहास रचला! अंतिम फेरी गाठणारी ठरली पहिली 'आर्मलेस' महिला आर्चर

मात्र या सलामीनंतर भारताने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. निशांत सिंधू ( Nishant Sindhu) आणि मानव सुथार (Manav Suthar) या डावखुऱ्या फिरकी जोडीने बांगलादेशला एका पाठोपाठ एक धक्के देण्यास सुरूवात केली. मानवने नैमला तर सिंधूने तंझीदला बाद करत सलामी जोडी माघारी धाडली.

यानंतर बांगलादेशच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. कर्णधार सैफ हसनने 22 तर महोम्मदुल हसन जॉय 20 धावा करून प्रतिकार केला. मात्र त्यांना मोठी खेळी करता आली नाही.

भारतकडून निशांत सिंधूने 20 धावात 5 तर मानव सुथारने 32 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्यांना अभिषेक शर्मा आणि युवराजसिंह धोदिया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

India Vs Pakistan ACC Emerging Asia Cup 2023
Jonny Bairstow : 6,6,6,6... जॉनी बेअरस्टोने बदला घेतला! अँडरसनमुळे शतक मात्र थोडक्यात हुकलं

भारत विरूद्ध पाकिस्तान सामना कधी?

फायनलमध्ये पोहचलेल्या भारत आणि पाकिस्तान अ संघाचा सामना हा 23 जुलैला रविवारी होणार आहे. हा सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्सवरून होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.