India Vs Pakistan World Cup 2023 Reschedule : आयसीसीने आणि बीसीसीआयने नुकतेच भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2023 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकावर पाकिस्तानने सातत्याने आक्षेप घेत त्यात बदल करण्याची मागणी केली होती.
पाकिस्तानला अहमदाबादमध्ये खेळवल्या जाणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यावर प्रामुख्याने आक्षेप होता. सुरक्षेच्या कारणास्तव या सामन्याचे ठिकणा बदलण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र आयसीसी आणि बीसीसीआयने या मागणीला केराची टोपली दाखवली होती.
मात्र आता बीसीसीआयला अहमदाबादमध्ये होणाऱ्या भारत - पाकिस्तान सामना रिशेड्युल करण्याबाबत गांभिऱ्याने विचार करावा लागणार आहे. कारण आता भारतातील सुरक्षा एजन्सीनीच या सामना रिशड्युल करण्याची मागणी केल्याचे वृत्त इनसाईड स्पोर्ट्सने दिले आहे.
याचे एकमेव कारण म्हणजे याच दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक गरबा खेळण्यास लोक बाहेर पडत असतात. (Narendra Modi Stadium)
अनेक चाहत्यांनी भारत - पाकिस्तान सामन्यासाठी आपले प्रवासाचे आणि राहण्याचे नियोजन केले आहे. या सामन्याची तिकीट विक्री काही दिवसातच सुरू होणार आहे. जर बीसीसीआय आणि आयसीसीला सामना रिशेड्युल करावा लागला तर खूप मोठी लॉजेस्टिकची समस्या निर्माण होऊ शकते. भारत - पाकिस्तान सामना हा कायम रेकॉर्ड ब्रेक टीआरपी देत असतो.
बीसीसीआच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, 'आम्ही आमच्याकडे उपलब्ध असलेल्या पर्यायांवर विचार करत आहोत आणि याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.' नवरात्रीच्या काळात भारत - पाकिस्तान सामना आयोजित केल्याने मोठ्या प्रमणावर गर्दी होऊ शकते. (Navratri)
त्यामुळे सुरक्षा एजन्सींनी सामना या कालावधित न ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या काळात हजारो चाहते अहमदाबादमध्ये (Ahmedabad) दाखल होण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये जवळपास 1 लाख आसन क्षमता आहे. या स्टेडियममध्ये वर्ल्डकपमधील 4 मोठे सामने होणार आहेत. गेल्या महिन्यातच आयसीसीने वर्ल्डकपचे शेड्युल जाहीर केले होते.
यानुसार नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंड - इंग्लंड हा सलामीचा सामना, भारत - पाकिस्तान हाय व्होल्टेड सामना, इंग्लंड ऑस्ट्रेलिया सामना आणि वर्ल्डकपचा फायनल सामना असे चार सामने होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.