भारत-पाकिस्तान यांच्यात उद्या महामुकाबला; स्पर्धेत शेजाऱ्यांची झालीय दयनीय अवस्था! टाईम नोट करून ठेवा

Asian Champions Trophy 2024 : पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक विजेता भारतीय संघ उद्या पाकिस्तानशी भिडणार आहे.
India vs pakistan
India vs pakistanesakal
Updated on

India vs Pakistan Hockey Match: भारत-पाकिस्तान सामना नेहमीच चर्चेच्या अग्रस्थानी असतो. अशातच उद्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारतीय हॉकी संघ व पाकिस्तानी हॉकी संघ पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पाकिस्तानला हा सामना जिंकणे बंधनकारक राहणार आहे आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेता भारतीय संघ स्पर्धेच्या सुरुवातीपासून विजयी घोडदौड करत आहे. त्यामुळे हा सामना अटीतटी होईल असे म्हटले जात आहे.

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ स्पर्धेत भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहचला आहे. तसेच उपांत्य फेरीत स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान हॉकी संघ आहे. अशातच शनिवारी दुपारी १:१५ वाजता भारत-पाकिस्तान दरम्यान चीनमधील मंगोलिया येथे लढत होणार असून आपल्याला सोनी स्पोर्ट्स टेन १ आणि टेन स्पोर्ट्स एचडी या टेलिव्हिजन चॅनल्स व सोनी लाईव्ह या मोबाईल ॲप वर पाहायला मिळेल.

नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने कांस्यपदक पटकावले आहे. अशातच भारत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे उद्याचा सामना पाहणे आणखीनच उत्सुकतेचे ठरणार आहे.

India vs pakistan
IND vs BAN, 1st test: गौतम सरांनी विराटकडून करून घेतला 45 मिनिटे सराव, जसप्रीत बुमराहने तर...

भारताने या स्पर्धेतील चारही सामने एकहाती जिंकून नेत्रदीपक कामगिरी केली आहे. भारताने चीनवर ३-० ने मात करत विजयी सुरुवात केली. त्यानंतर जपानविरुद्ध ५-१ ने, तर मलेशियाविरुद्ध ८-१ ने विजय मिळवला. चौथ्या सामन्यात कोरियाचा ३-१ ने पराभव करत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे.

कर्णधार हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहे. जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असणाऱ्या हरमनप्रितने भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. त्याचबरोबर भारताचे युवा खेळाडू देखील उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.

दिग्गज प्रशिक्षक ताहीर झमनच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तान संघ स्पर्धेत उतरला आहे. पाकिस्तानने स्पर्धेची सुरुवात कोरियासोबत २-२ च्या बरोबरीने केली. परंतु जपानविरुद्ध २-१ आणि चीनविरुद्ध ५-१ ने विजय मिळवत त्यांनी स्पर्धेत पुनरागमन केले होते. जर पाकिस्तानला उपांत्य फेरीत स्थान मिळवायचे असेल तर त्यांना भारतासोबत किमान बरोबरी करण्याची गरज आहे.

India vs pakistan
जर Joe Root ने सचिनचा विक्रम मोडला, तर असा काय फरक पडणारे? गावसकरांचा माजी कर्णधाराला थेट सवाल

भारत-पाकिस्तान हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. परंतु भारताने पाकिस्तानविरुद्ध नेहमीच बाजी मारली आहे. भारत - पाकिस्तानमधील १६ सामन्यांपैकी १४ सामने भारताने जिंकले आहेत आणि उर्वरित २ सामने बरोबरीचे झाले आहेत. दोन्ही संघांदरम्यान शेवटचा सामना आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये झालेला ज्यामधे भारताने १०-२ ने बाजी मारली होती.

स्पर्धेमध्ये भारताचे वर्चस्व असताना देखील कर्णधार हरमनप्रीत सिंगने सावधानतेचा पवित्रा घेतला आहे, "आम्ही पाकिस्तान संघाला सामोरे जाताना मागील निकालांचा फरक पडत नाही. ते कोणत्याही क्षणी पुनरागन करू शकतात. त्यामुळे आम्हला खेळावर लक्ष केंद्रित करायला हवे." असे हरमनप्रीत म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.