IND vs PAK Melbourne Weather : ऑस्ट्रेलियाचे वेदर काय म्हणत; भारत-पाक भिडणार की स्वतःच थैमान घालणार

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर पावसाची छाया पसरली आहे अशा परिस्थितीत आज पाऊस होईल का सामना ?
India vs Pakistan Melbourne weather forecast
India vs Pakistan Melbourne weather forecastsakal
Updated on

India vs Pakistan Melbourne weather forecast : भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषक 2022 मधील सर्वात मोठा सामना आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. दोन्ही संघ यंदा तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. या 'ब्लॉकबस्टर' सामन्यापूर्वी हे दोघे गेल्या महिन्यात आशिया चषकात आमनेसामने आले होते. भारताने गट टप्प्यातील सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला, तर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने शानदार पुनरागमन करत सुपर 4 टप्प्यात भारताचा पराभव केला.

India vs Pakistan Melbourne weather forecast
जोस भाऊचा कॅच नाही पहिला तर काय पाहिलं! हवेत उडत पकडला आश्चर्यकारक कॅच, पाहा VIDEO

टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर पावसाची छाया पसरली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला मेलबर्नमध्ये जोरदार पाऊस झाला होता. बुधवारी आणि गुरुवारीही पावसाची रिपरिप सुरूच होता. स्थानिक हवामान खात्यानुसार, भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या दिवशी पावसाचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत आज पाऊस भारत-पाकिस्तानच्या चाहत्यांच्या मनाला तडा जाईल की हवामान निरभ्र होऊन सामना पूर्ण होईल, जाणून घेऊया.

India vs Pakistan Melbourne weather forecast
Aus vs Nz ICC T20 World Cup : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाची शरणागती

Accuweather नुसार, दिवसभर मैदान ढगाळ राहील, तर पावसाची शक्यता 40 टक्के आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांच्या तुलनेत पावसाची शक्यता फारच कमी आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना भारत-पाकिस्तान सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. सामना सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. मेलबर्नमध्ये गेल्या काही तासांपासून पाऊस पडला नाही, परंतु ढगाळ वातावरण आहे. आता या सामन्यादरम्यान पाऊस खलनायक ठरू नये एवढीच अपेक्षा चाहत्यांना आहे.

India vs Pakistan Melbourne weather forecast
IND VS PAK ICC T20 World Cup : मळभ दूर आता उत्कंठा शिगेला
  • टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

  • टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद आणि उस्मान कादिर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()