IND vs AUS Final Pitch : फायनलमध्ये देखील भारत - पाक सामन्याची पुनरावृत्ती? खेळपट्टीबाबत आली मोठी माहिती समोर

IND vs AUS Final Pitch
IND vs AUS Final Pitchesakal
Updated on

IND vs AUS Final Pitch : भारतात सुरू असलेल्या वनडे वर्ल्डकप 2023 च्या बाद फेरीत खेळपट्टीवरून बराच वाद झाला आहे. बीसीसीआय भारताला फायदा होईल अशा खेळपट्ट्या तयार कराव्यात यासाठी हस्तक्षेप करतो असा आरोप होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात कोणती खेळपट्टी वापरण्यात येणार याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमी फायनल सामना हा फ्रेश खेळपट्टीवर न होता वापरलेल्या खेळपट्टीवर झाला होता. त्यावेळी यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. आता वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध देखील वापरलेलीच खेळपट्टी असण्याची शक्यता आहे.

IND vs AUS Final Pitch
Ind vs Aus World Cup Final : खेळपट्टीने फसवले! द्रविड अन् सचिनचा सल्ला ऐकला नसता तर गांगुलीने वर्ल्ड कप जिंकला असता

विशेष म्हणजे फायनल सामन्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लीग स्टेजच्या 14 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यातील खेळपट्टीच फायनलसाठी देखील वापण्यात येणार आहे अशी माहिती द इंडियन इक्सप्रेसने दिली आहे. यामुळे भारत - पाकिस्तान सामन्याचा जसा निकाल लागला तसाच निकाल वर्ल्डकप फायनलचा देखील लागण्याची शक्यता आहे.

वापरलेल्या खेळपट्टीवरून एवढा वादंग का?

आयसीसीच्या बाद फेरीत पहिल्यांदाच वापरलेल्या खेळपट्ट्यांवर सामने खेळवले जात आहेत असं नाही. गेल्या वर्षी टी 20 वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड या तगड्या संघांचा समावेश होता. त्यावेळी देखील सेमी फायनल राऊंड हा वापरलेल्या खेळपट्टीवरच झाला होता.

वनडे वर्ल्डकपच्या फायनलची स्थिती वेगळी आहे. ही स्पर्धा फक्त बीसीसीआय आयोजित करत नाहीये तर भारतीय संघ अंतिम फेरीत देखील पोहचला आहे. त्यामुळे बीसीसीआय भारताच्या फायद्याचा निर्णय घेईल अशी शंका व्यक्त केली जात आहे.

IND vs AUS Final Pitch
Ind vs Aus WC 2023: तो खेळाडू म्हणुन चांगला, पण माणूस म्हणून... वर्ल्डकप फायनलआधीच शमीच्या बायकोचं विधान चर्चेत

वापरलेली खेळपट्टीच का?

न वापरलेली फ्रेश खेळपट्टी वापरलेल्या खेळपट्टीसारखी लवकर ब्रेक होत नाही. खेळपट्टी ब्रेक झाली की ती संथ होते आणि त्याचा फायदा फिरकीपटूंना होतो. मात्र फ्रेश खेळपट्टी ब्रेक होईल याची शाश्वती नाही. ती लवकर डिटोरेट होण्याची शक्यता देखील नसते.

वापरलेल्या खेळपट्टीवर फायनल सामना खेळवण्यामागे या सामन्यात फिरकीपटूंना देखील साथ मिळावी हा हेतू असतो. संथ खेळपट्टीवर फिरकीपटूंना चांगली ग्रिप मिळते. भारताकडे दर्जेदार फिरकीपटू मोठ्या संख्येने आहेत.

ऑस्ट्रेलियन खेळाडू हे वेगवान खेळपट्टीवर खेळणे पसंद करतात. त्यांना भारतीय खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. दुसरीकडे भारतीय फलंदाज आणि गोलंदाज मायदेशात लगेचच जुळवून घेऊ शकतात. अशा परिस्थितीत घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा थोडा कमी करण्यासाठी आयसीसी सहसा बाद फेरीत फ्रेश खेळपट्टी वापरते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.