ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup 2022) सामन्यासाठीची 2,00,000 तिकीटांची विक्री आताच झाली आहे. यातील 60,000 तिकीट भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामन्यांची आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज लढतीशिवाय टी20 वर्ल्ड कप फायनल आणि इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्धची ऑस्ट्रेलियाच्या ग्रुपमधील सामन्यांची तिकीटांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे.
आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत - पाकिस्तान (India Pakistan) यांच्यातील सामना 23 आक्टोबर 2022 मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) नियोजित आहे. साखळी सामन्यातील तिकीटांची विक्री सुरु झाल्यानंतर अवघ्या 5 तासांत भारत पाकिस्तान यांच्यातील लढतीची तिकीटे विकली गेली. भारत पाकिस्तान सामना ज्या मैदानात नियोजित आहे ते स्टेडियम जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमपैकी एक आहे.
जवळपास 1 लाख प्रेक्षक बसण्याची क्षमता याठिकाणी आहे. साखळी फेरीतील सामन्यांच्या ऑनलाईन तिकीट विक्रीला सुरुवात झाल्यानंतर लोकांनी सर्वाधिक पसंती ही भारत पाकिस्तान यांच्यातील लढतीला दिली. 16 आक्टोबर ते 13 नोव्हेबर दरम्यान ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा पार पडणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीला नेहमीच मोठी पसंती मिळत असते. युएईच्या मैदानात झालेला भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना सर्वाधिक पाहिला गेला होता. वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघाला पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्याने भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या मैदानात उतरेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ युएईतील वचपा काढणार का? हे पाहण्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक असल्याचे तिकीट विक्रीतून दिसून येते.
टी-20 वर्ल्ड कप 2022 भारतीय संघाचे सामन्यांचे वेळापत्रक
ऑस्ट्रेलियात रंगणारी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा 16 आक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. सुपर 12 मधील साखळी सामन्यांच्या लढतीत मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरुन भारतीय संघ पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने स्पर्धेची सुरुवात करेल. पर्थच्या मैदानात भारतीय संघाचा दुसरा सामना खेळवला जाईल. ग्रुप B मधील अव्वल स्थानी असलेला संघ 27 आक्टोबरला भारता विरुद्ध खेळताना दिसेल. याच मैदानात 30 आक्टोबरला भारत ग्रुप A मधील दुसऱ्या स्थानावरील संघाविरुद्ध भिडेल. 3 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिका आणि 6 नोव्हेंबरला टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध सामना खेळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.