HM Amit Shah in Ind Vs Pak Match: नुकताच भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये वर्ल्ड कप २०२३चा हाय वोल्टेज सामना खेळवला गेला. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्धचा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली. हा सामना पाहण्यासाठी खेळाडूंच्या नातेवाईकांनीही त्यांना कंटाळून सोडले. खेळाडू तिकीटाची मागणी पाहून इतके त्रस्त झाले की त्यांनी मित्रांना आणि नातेवाईकांना थेट सामना घरुनच पाहण्याचा सल्ला दिला.
अशातच, भारताचे गृहमंत्री अमित शाह यांना देखील सामना पाहण्याचा मोह आवरला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सहकुटुंब या सामन्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी कॅमेऱ्याकडे पाहून जल्लोष साजरा केला आणि कॅमेऱ्याकडे बघून व्हिक्टरी साईनही दाखवली.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. भारताच्या गोलंदाजांनी चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन करत पाकिस्तानचा डाव १९१ धावांमध्येच संपुष्टात आणला.
पाकिस्तान संघासाठी कर्णधार बाबर आझम याने सर्वाधिक ५० धावा केल्या. त्याच्या या डावात त्याने ७ चौकारही लगावले. त्याला यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यानेही सुरेख साथ दिली आणि पाकिस्तानला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात मदत केली. मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर पाकिस्तान संघाचे उर्वरित फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं.(Latest Marathi News)
मिळालेल्या १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात देखील निराशजनक झाली. सलामीवीर शुबनमन गिल १६ धावांवर खेळत असताना झेलबाद झाला.त्यानंतर विराट कोहली १६ धावांवर बाद झाला. कर्णधार रोहित शर्मा याने उत्कृष्ट फलंदाजीच प्रदर्शन करत भारताला मजबूत स्थितीत आणलं. रोहितने ६३ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८६ धावा केल्या. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.