IND vs RSA : अरूण जेटली स्टेडियम झाले हाऊस फुल्ल

India Vs South Africa 1st T20 Delhi Arun Jaitley Stadium
India Vs South Africa 1st T20 Delhi Arun Jaitley Stadium esakal
Updated on

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी 20 सामन्यांची मालिका 9 जून पासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर होणार आहे. कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीस परवानगी मिळाली आहे. पहिल्या सामन्याची जवळपास 94 टक्के तिकिटे बुक झाली आहेत. (India Vs South Africa 1st T20 Delhi Arun Jaitley Stadium Almost Houseful)

India Vs South Africa 1st T20 Delhi Arun Jaitley Stadium
भारतीय महिला सायकलपटूचा प्रशिक्षकावर गैरवर्तणूक केल्याचा आरोप

दिल्लीत नोव्हेंबर 2019 नंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करण्यात येत आहे. याबाबत दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सह सचिव राजन मनचंदा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, '35 हजार आसन क्षमतेच्या 94 टक्के तिकिट विक्री झाली असून आता फक्त 400 ते 500 तिकिटेच उरली आहेत.

दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने (DDCA) जवळपास 27 हजार तिकीटे विक्रीसाठी ठेवली होती. याचबरोबर चाहत्यांचा एक चांगला अनुभव देण्यासाठी वरिष्ठ नागरिकांसाठी गोल्फ कारमधून स्टेडियममध्ये दाखल होण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

India Vs South Africa 1st T20 Delhi Arun Jaitley Stadium
कोहलीचे 'विराट' रेकॉर्ड तोडण्यासाठी बाबर आजम सज्ज

देशभरतील कोरोनाची स्थिती सध्या नियंत्रणात असली तरी डीडीसीएने प्रेक्षकांना मास्क घालून येण्याची विनंती केली आहे. याबाबत सह सचिव मनचंदा यांनी सांगितले की, 'आमच्या कर्मचाऱ्यांची नियमीतपणे कोरोना चाचणी होत असते. आम्ही आमच्या प्रेक्षकांना देखील सांगू इच्छितो की कोरोनाच्या नियमांचे पालन करा आणि सतत मास्क घाला.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()