नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलर आणि रासी वेन डुसेनने तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांची नाबाद भागीदारी रचत भारताच्या सलग 13 वा टी 20 सामना जिंकण्याच्या मनसुब्यावर पाणी फेरले. डुसेनने नाबाद 46 चेंडूत नाबाद 75 धावा केल्या. त्याने श्रेयस अय्यरने दिलेल्या जीवनदानाचा चांगलाच फायदा उचलला. तर डेव्हिड मिलरने 31चेंडूत 64 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारताचे 212 धावांचे आव्हान 19.1 षटकात पार केले. भारताकडून भुवनेश्वर, अक्षर आणि हर्षल पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली. भारताकडून इशान किशनने 76 तर श्रेयस अय्यरने 36 धावांची खेळी केली. कर्णधार ऋषभ पंतने 29 तर हार्दिक पांड्याने आक्रमक 31 धावांची खेळी केली.
सावध फलंदाजी करत मिलरला साथ देणारा दुसेनने देखील आपला गिअर बदलला. त्याने 17 वे षटक टाकणाऱ्या हर्षल पटेलला तीन षटकार एक चौकार मारत 22 धावा वसूल केल्या. याचबरोबर त्याने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले.
सलामीवीर क्विंटन डिकॉक 22 धावांची भर घालून माघारी गेल्यानंतर डेव्हिड मिलरने दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. त्याने दमदार अर्धशतक ठोकत संघाला 16 व्या षटकात 150 शतकी मजल मारून दिली.
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डिकॉक एक मोठी खेळी खेळण्याच्या इराद्यात होता. मात्र अक्षर पटेलने त्याला 22 धावांवर बाद करत आफ्रिकेला तिसरा आणि मोठा धक्का दिला.
बावुमा बाद झाल्यानंतर आलेल्या ड्वेन प्रेटोरियसने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करत संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र हर्षल पटेलने प्रेटोरियसची 13 चेंडूत केलेली 29 धावाची खेळी संपवली.
भारताचे 212 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला भुवनेश्वर कुमारने पहिला धक्का दिला. त्याने कर्णधार टेम्बा बावुमाला 10 धावांवर बाद केले.
हार्दिक पांड्याने 12 चेंडूत नाबाद 31 धावा करून भारताला 211 धावांपर्यंत पोहचवले. टी 20 मधील दक्षिण आफ्रिकेविरूद्धची ही भारताची सर्वोच्च धावसंख्या ठरली.
16 चेंडूत 29 धावा करून संघाला द्विशतकी मजल मारून देण्यात मोठा वाटा उचलणाऱ्या ऋषभ पंतला नॉर्त्जेने बाद केले.
अय्यर बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने गिअर बदलत आक्रमक फटकेबाजी केली. त्याने 18 व्या षटकात संघाला 180 धावांचा टप्पा गाठून दिला.
इशान किशन बाद झाल्यानंतर भारताची धावगती मंदावली. त्यातच प्रेटोरियसने 36 धावांवर खेळणाऱ्या श्रेयस अय्यरचा त्रिफळा उडवला.
सलामीला आलेल्या इशान किशनने पॉवर प्लेनंतर तुफान फटकेबाजी करत 48 चेंडूत 76 धावांची खेळी केली. मात्र ज्या केशव महाराजला त्याने चोपला होता त्यानेच त्याला बाद केले.
ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने आक्रमक सुरूवात केली. याचबरोबर सुरूवातीला चाचपडत खेळणाऱ्या इशान किशनने देखील आपला गिअर बदलला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला 10 व्या षटकातच शतकी मजल मरून दिली.
पार्नेलने भारताला पहिला धक्का दिला. त्याने 15 चेंडूत 23 धावा करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला बाद केले.
इशान किशन आणि ऋतुराज गायकवाडने भारताच्या डावाची सुरूवात केली. या दोघांनी पॉवर प्लेमध्येच भारताला अर्धशतकी मजल मारून दिली.
क्विंटन डिकॉक, टेम्बा बावुमा, रासी वेन डुर ड्युसेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पार्नेल, ड्वेन प्रेटोरियस, केशव महाराज, तबरेझ शमसी, कसिगो रबाडा, नॉर्त्जे
इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान
पहिल्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यासाठी दिल्लीतील अरूण जेटली मैदान सज्ज झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.