IND vs SA : पहिल्या T20 सामन्यावर संकट, स्टेडियममध्ये नाही ​​लाईट; सामना कसा होणार

भारत-दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या सामन्यावर संकट, जाणून घ्या काय आहे नेमकं 'कारण'
india vs south africa 1st t20i match greenfield stadium karyavattom power supply cut cricket
india vs south africa 1st t20i match greenfield stadium karyavattom power supply cut cricketsakal
Updated on

India vs South Africa 1st T20i : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना 28 सप्टेंबरला खेळल्या जाणार आहे. तिरुवनंतपुरम मधील कार्यवत्तम येथील ग्रीनफील्ड स्टेडियमवर हा पहिला सामना होणार आहे. भारत-आफ्रिका आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी हे स्टेडियम सज्ज आहे. यापूर्वी केरळ स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड लिमिटेडने (KSEBL) स्टेडियम प्रशासनाला मोठा धक्का दिला आहे. 2.36 कोटींची थकबाकी न भरल्याने वीज मंडळाने वीजपुरवठा बंद केला आहे.

india vs south africa 1st t20i match greenfield stadium karyavattom power supply cut cricket
Mohammed Shami : T-20 मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का, मोहम्मद शमीला कोरोनाची लागण

गेल्या तीन वर्षांपासून ग्रीनफील्ड स्टेडियमचे वीज बिल भरलेले नाही. यामुळे केएसईबीएलने थकबाकी भरण्याची मागणी केली आहे. स्टेडियम प्रशासनाने थकबाकी न भरल्यास पाण्याच्या लाईन्स तोडण्याची धमकी दिली आहे. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सामन्याच्या 10 दिवस आधी ग्रीनफील्ड स्टेडियमचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये भाड्याने घेतलेल्या जनरेटरच्या सहाय्याने देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे. अनेक वेळा ताकीद देऊनही थकबाकी भरली नसल्याचे वीज मंडळाचे म्हणणे आहे.

india vs south africa 1st t20i match greenfield stadium karyavattom power supply cut cricket
Ind vs Aus : शमीऐवजी 'या' खेळाडूला संधी, तीन वर्षांपासून खेळला नाही T20 सामना!

राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ग्रीनफिल्ड स्टेडियमसाठी केरळ स्पोर्ट्स फॅसिलिटी लिमिटेड जबाबदार आहे. ज्याने गेल्या तीन वर्षांत वीज आणि पाण्याचे बिल भरलेले नाही. KSSFL चे मत आहे की ते राज्य सरकारच्या वार्षिक निधीशिवाय थकबाकी भरण्यास असमर्थ आहेत. त्याचबरोबर केरळ क्रिकेट असोसिएशनने केएसएफएलला जबाबदार धरले आहे. KSFL कडे तिरुअनंतपुरम कॉर्पोरेशनचे 2.85 कोटी रुपये कर थकीत आहेत.

आता 28 सप्टेंबरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर परिणाम होऊ नये म्हणून हे संकट सोडवण्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत आहे. या क्रिकेट सामन्याच्या तिकिटांची विक्री सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनने राज्य सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.